Share

गॅस सिलेंडर दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार

Published On: 

नवी दिल्ली : किराणा वस्तूंच्या किमतीतही भरघोस वाढ झाली आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती तरी शासनाने नियंत्रणात ठेवल्यास सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळू शकेल. ऑईल कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीमध्ये मोठी वाढ केली आहे.

१४.२ किलोच्या घरगुती सिलेंडरची किंमत ५० रुपयांनी वाढवली आहे. तर पाच किलो ग्रॅम छोट्या सिलेंडरच्या किंमतीत १८ रुपयांची दरवाढ झाली आहे. अचानकच झालेल्या या दरवाढीचा सर्वसामान्य नागरिकांना फटका बसत आहे. लॉकडॉऊन कालखंडापासून विविध किमतीमध्ये प्रचंड दरवाढ झाली आहे.

घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात सातत्याने वाढ होत असल्यामुळे राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक झाली असून संपूर्ण राज्यभर जिल्हानिहाय आंदोलने करणार असल्याची घोषणा महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केली असल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे.

गॅस सिलेंडरच्या दरातील वाढ ही गेल्या दोन वर्षांतील सर्वाधिक असून त्याच्याबरोबर पेट्रोल आणि डिझेलमध्येही सातत्याने वाढ होत आहे. दरवाढीचा हा त्रास गृहिणींनाच जास्त होत आहे. सध्याच्या कोरोनाच्या काळात सर्वसामान्यांची आर्थिक आवक मंदावली असतानाच केंद्रसरकार मात्र दिलासा देण्याऐवजी त्यांच्या जीवनावश्यक वस्तूंमध्ये दरवाढ करून त्यांची गळचेपी करत आहे. त्यांच्या खिशावर डल्ला मारण्याचे काम केंद्रसरकार जाणीवपूर्वक करत आहे असा आरोपही रुपाली चाकणकर यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!