🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : राज्यात भाजप – शिवसेना महायुतीचे सरकार येणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी कोणाकडे सोपवायची यावर चर्चा सुरु झाली आहे. तसेच विरोधी पक्षनेते पद हे निकालाच्या आकडेवारीनुसार राष्ट्रवादी कॉंग्रेसकडेचं जाणार असल्याचे दिसत आहे.
सर्वात मोठा विरोधी पक्ष असल्याने विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीला मिळणार आहे. मात्र विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादीत अनेकजण स्पर्धेत आहेत. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे नाव या स्पर्धेत आघाडीवर आहे.
विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी धनंजय मुंडे यांनी सांभाळली आहे. तो अनुभव पाहता त्यांचं नाव या स्पर्धेत सर्वात पुढे आहे. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांची नावंही विरोधी पक्षनेतेपदाच्या शर्यतीत आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1188001960311394304?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1188000922552504320?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
