मुंबई : कंगना रणौतने ट्विट करत टीकाकारांना खुले आव्हान दिले होते. शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी कंगनाला मुंबईत पाऊल ठेऊ देणार नाही, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे तिने या ट्विट द्वारे टीकाकारांसह संजय राऊत यांनाच अप्रत्यक्षपणे आव्हान दिल्याच्या चर्चा रंगु लागल्या आहेत. यावर आता, संजय राऊत यांनी देखील अत्यंत धारदार प्रत्युत्तर दिले आहे.
संजय राऊत यांनी उल्लेख न करता जळजळीत ट्विट केले आहे. ” मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे…ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा..शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्या शिवाय राहाणार नाही. प्रॉमिस. जय हिंद ,जय महाराष्ट्र!”असे ट्विट करत नाव न घेता कंगना रणौतवर त्यांनी घणाघात घेतला असून कंगना ने दिलेल्या आव्हानाला आता शिवसेना कोणत्या स्टाईलने कंगना रणौतला टक्कर देणार याने राजकारणासह राज्यातील वातावरण तापलं आहे.
मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे…ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा..शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्या शिवाय राहाणार नाही.
promise.
जय हिंद
जय महाराष्ट्र— Sanjay Raut (@rautsanjay61) September 4, 2020
चेन्नईला अजून एक धक्का हा खेळाडू संघाबाहेर,धोनीची चिंता वाढली
काय आहे हे प्रकरण?
अभिनेत्री कंगना रणौत हिने अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासावरून मुंबई पोलिसांवरच संशय घेत आरोप केले . तर, “मला बॉलिवूड माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते अशा आशयाचे ट्विट केले होते. दरम्यान, मला मुंबईत न येण्याची धमकी दिली जात आहे. मुंबईत असुरक्षित वाटत असून मुंबई आता पाकव्याप्त काश्मिरसारखी झाली आहे,” असे ट्विट अभिनेत्री कंगनाने केल्यानंतर आता तिला चांगलेच लक्ष्य केले जात आहे.
के.के.रेंजप्रश्नी शेतकरी राज ठाकरे यांना भेटणार!
तिने, “मी मुंबईत येऊ नये अशी मला बरेच लोक धमकी देत आहेत. म्हणूनच मी येत्या आठवड्यात मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या आठवड्याच्या ९ तारखेला मी येणार असून मुंबईमध्ये लँड होण्याची वेळ देखील मी पोस्ट करेन, कुणाच्या बापाची हिम्मत असेल तर रोखून दाखवा.” असं कंगनानं आव्हानच दिलं आहे.
मोदींच्या आणखी एका व्हिडीओवर डिस्लाईकचा पाऊस, तरुणाईचा संताप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

