पुणे : दिग्दर्शक अजित शिरोळे आणि लेखक प्रताप गंगावणे यांनी स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ‘शिवपुत्र संभाजी’ या बहुभाषिक चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे. याआधी अजित शिरोळे यांनी १३ यशस्वी मराठी सिनेमे दिग्दर्शित केले आहेत. आता अजित शिरोळे ‘शिवपुत्र संभाजी’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाले आहेत. तर प्रताप गंगावणे यांनी शंभरहून अधिक सिनेमांचे लेखक, तसेच राजा शिवछत्रपती, स्वराज्यरक्षक संभाजी, स्वराज्य जननी जिजामाता, बाजीराव मस्तानी अशा ऐतिहासिक मालिकेचे लेखन केले असून त्यांनी हा सिनेमा देखील लिहिला आहे. या सिनेमाच्या पोस्टरने अगदी कमी वेळात प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे.
याबाबत अजित म्हणाले की, ”संभाजी महाराजांच्या चरित्राने व कर्तृत्वाने मला नेहमीच प्रेरणा दिली आहे. संभाजी महाराज थोर आणि कुशल राजे आहेत. वयाच्या केवळ १४ व्या वर्षी अनेक भाषांमध्ये त्यांनी प्रभुत्व मिळवले होते. त्यांनी संस्कृतमधून ‘बुधभूषण’ हा ग्रंथ लिहिला. त्याशिवाय ‘नायिकाभेद’, ‘नखशिख’ आणि ‘सातसतक’ हे ब्रज भाषेतले ग्रंथ लिहिले. स्वराज्यासाठी त्यांनी अनेक युद्ध लढली. हा इतिहास प्रत्येकाला माहिती असणं आणि देशाभिमान जागृत होणं आवश्यक आहे असं मला वाटतं.’ असे अजित शिरोळे अभिमानाने सांगत होते.
लॉकडाऊन संपल्यावर सिनेमाचं शूटिंग रायगड, तुळापूर आणि संगमेश्वर अशा संभाजी महाराजांशी निगडीत रिअल लोकेशनवर होणार आहे. तसंच सिनेमाच्या कलाकारांची नावंही लवकरच जाहीर होणार आहेत. शिवानी मूव्हीज आणि धनराज प्रॉडक्शनच्या संयुक्त निर्मितीतून ‘शिवपुत्र संभाजी’ हा सिनेमा भेटीला येत आहे. हा सिनेमा चार भाषेत प्रदर्शित होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘गलती उन्ही से होती है…’ मोदी सरकारवर टिकेनंतर अनुपम खेर यांनी घेतला यु टर्न
- ठाण्यात दरोडा टाकून औरंगाबादेत वास्तव्यास राहणारा मोक्कातील आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात
- राज्यांना दिलेल्या व्हेंटीलेटर्सचे ऑडीट करा ; मोदींनी दिले आदेश
- देशाचे स्मशान बनविणा-या नरेंद्र मोदींच्या पापावर पांघरून घालण्याचा प्रयत्न फडणवीस करत आहेत : नाना पटोले
- काँग्रेस नेते राजीव सातव यांची प्रकृती नाजूक, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

