नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे केंद्र आणि राज्य सरकारांची चिंता वाढली आहे. देशातल्या कोरोना स्थितीचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक घेत आढावा घेतला. अनेक राज्यात व्हेंटिलेटर धूळ खात पडत असल्याच्या बातम्यांची पंतप्रधान मोदींनी गंभीर दखल घेतली. केंद्राने पुरवलेल्या व्हेंटिलेटरचा वापर, सद्यस्थिती याबाबत तातडीने ऑडिट करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून आरोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत आहे.
ग्रामीण भागातही ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित व्हावा यासाठी यंत्रणा सक्षम करण्याबाबत पंतप्रधान मोदींनी आदेश दिले आहेत. राज्यांनी आकडेवारीचं भय न ठेवता जास्तीत जास्त टेस्ट प्रामाणिकपणे कराव्यात असा सल्ला देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. पॉझिटिव्हिटी रेट जास्त असलेल्या भागात टेस्टिंग अजून वाढवण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलं.
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी म्हटलंय की केंद्र सरकारकडून राज्यांना दिल्या गेलेल्या व्हेंटीलेटर्सचा वापर आणि सध्यस्थितीबाबतचे ऑडीट त्वरित केलं पाहिजे. एका अधिकृत वक्तव्यात म्हटलं गेलंय की, काही राज्यांमध्ये पुरवलेले व्हेंटीलेटर्स स्टोअरेजमध्येच पडून राहण्याच्या बातम्यांना गंभीरपणे घेतलं गेलं आहे तसेच असा आदेश दिला गेलाय की, केंद्र सरकार द्वारे दिले गेलेल्या व्हेंटीलेटर्सचे इन्स्टॉलेशन आणि ऑपरेटींग याचं तातडीने ऑडीट केलं जावं. पुढे पंतप्रधानांनी म्हटलंय की, जर आवश्यक असेल तर आरोग्य कर्मचार्यांना व्हेंटीलेटर्स योग्य प्रकारे वापरण्याचे प्रशिक्षण द्यायला हवं. असे मत देखील यावेळी त्यांनी मांडले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- देशाचे स्मशान बनविणा-या नरेंद्र मोदींच्या पापावर पांघरून घालण्याचा प्रयत्न फडणवीस करत आहेत : नाना पटोले
- जगनमोहन रेड्डींचा जामीन रद्द करण्याची मागणी करणाऱ्या खासदाराला अटक
- ये पब्लिक है, सब जानती है! देवेंद्र फडणवीस यांचे आता थेट सोनिया गांधींना पत्र
- ‘लसीकरण बंद करण्याबाबतचे आरोग्यमंत्र्यांचे ‘ते’ विधान म्हणजे खोटारडेपणाचा कळस’
- ‘पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी जे नियोजन करायला हवे होते ते केले नाही’


