टीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समजाला आरक्षण दिले जाईल. असे आश्वासन दिले होते. मात्र सरकाराने गेल्या १० महिन्यात आरक्षणासंदर्भात कोणताच निर्णय घेतला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा सरकारला जागे करण्यासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे.मराठा क्रांती ठोक मोर्चाला परळीत सुरुवात झाली असून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हजारोंच्या संख्येने मराठा बांधव जमले आहेत.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अनुदानाचे काय झाले?आरक्षण, शेतकरी कर्जमाफी, कोपर्डी प्रकरण, शिवस्मारक या सर्व प्रश्नाचे उत्तर मराठा समाज मुख्यमंत्र्यांना विचारणार आहेत.मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांसह मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतून मराठा बांधव परळीत दाखल झाले आहेत.
तुळजापूरमध्ये २९ जूनला जागरण गोंधळ घालून मराठा क्रांती मोर्चाचे दुसरे पर्व सुरू करण्यात येईल. यावेळेस मूक मोर्चा नाही, तर ठोक मोर्चा असेल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आतापर्यंत काय केलं ? मुंबई उच्च न्यायालयाचा सरकारला सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

