पुणे : सारथी संस्थेबाबत मंत्री विजय वडेट्टीवार हे चुकीची माहिती देऊन मराठा समाजाची दिशाभूल करीत आहेत. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन त्याठिकाणी दुसरा सक्षम मंत्री नेमावा. तसेच मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली त्वरित बैठक बोलवावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा पुणे जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली आहे.
प्रवीण तरडेंनी केली नव्या सिनेमाची घोषणा
मराठा क्रांती मोर्चा पुणे जिल्ह्याच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी मोर्चाचे समनव्यक राजेंद्र कुंजीर, राजेंद्र कोंढरे, रघुनाथ चित्रे, धनंजय जाधव, बाळासाहेब आमराळे, सचिन आडेकर, श्रुतिका पाडाळे, मीना जाधव यांसह पदाधिकारी उपस्थित होते.
सारथी संस्थेची स्वायत्तता धोक्यात आली असताना सारथी स्वायत्त आहे, अशी चुकीची माहिती मंत्री देत आहेत. सारथी मध्ये भ्रष्टाचार झाला म्हणून चौकशी समिती नेमली आहे. या समितीने आपला अहवाल दिलेला असताना दुसरी समिती नेमण्याचा घाट घातला जात आहे. वास्तविक पाहता पहिल्या समितीचा अहवाल नागरिकांसाठी खुला करण्यात यावा. या खात्याला विजय वडेट्टीवार न्याय देऊ शकत नसल्याने त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राजेंद्र कुंजीर यांनी केली.
महाविकास आघाडीत बिघाडी नाही म्हणणाऱ्या थोरातांचा दावा २४ तासात सेनेने ठरवला खोटा
याशिवाय विद्यार्थ्यांचे विद्यावेतन रखडले आहे. सारथी संस्थेची छळवणूक सुरु आहे. विजय वडेट्टीवार यांनी या खात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर भेदभाव केला जात आहे, असा आरोपही यावेळी या पत्रकार परिषदेत केला.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
