Share

महाविकास आघाडीत बिघाडी नाही म्हणणाऱ्या थोरातांचा दावा २४ तासात सेनेने ठरवला खोटा

Published On: 

अहमदनगर : राज्यात शिवसेनेसोबत सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची स्थानिक पातळीवर अनेक ठिकाणी कुरबुर सुरूच आहे. राज्यात सत्ता येण्यापूर्वीच पारनेरला शिवसेना व राष्ट्रवादीचे जुगाड जमवून नगरपंचायतीत सत्ता आली होती. आता पुढील निवडणुकीच्या तोंडावर बेबनाव झाला असून शिवसेनेचे पाच नगरसेवक राष्ट्रवादीच्या गोटात सामील झाले आहेत. त्यामुळे पारनेर शहरात राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांचे वर्चस्व वाढले असून शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांना मोठा धक्का मानला जात आहे.

एटिकेटीच्या विद्यार्थ्यांनो आमच्यावर विश्वास ठेवा- उदय सामंत

दरम्यान, शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी मिळून महाविकास आघाडी स्थापन करून राज्यात सत्ता आणल्यानंतर हे फोडाफोडीच राजकारण पहिल्यांदाच झाले असून आता शिवसेना यावर काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्व उत्सुकतेने पाहत आहेत. हे तीन पक्षाचं सरकार जास्त काळ टिकणार नसल्याचं विरोधकांच मत असून, बारामती मध्ये खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थिती मध्ये झालेल्या प्रवेशाचे राज्यभर पडसाद पाहायला मिळू शकतील अशी शक्यता निर्माण झाली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात पारनेरमध्ये सहा शिवसेना नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याच्या प्रश्नावर महसुलमंत्री बाळासाहेब थोरातांनी प्रतिक्रिया काल दिली.राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी नाही. आघाडी भक्कम आहे, एकत्र आहे आणि एकत्र काम करत आहे. काही लोक आघाडीत बिघाडी होण्याची वाट पाहात आहेत, असा टोला बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांना काल लगावला होता.

थोरात यांचा दावा शिवसेनेने २४ तासांच्या आत खोटा ठरवला असून पारनेरमध्ये आपले नगरसेवक फोडल्याचा वचपा शिवसेनेने कल्याणमध्ये काढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सेना-भाजपच्या हातमिळवणीमुळे कल्याण पंचायत समितीत राष्ट्रवादीने सभापती आणि उपसभापतीपद गमावले आहे. अंबरनाथमध्ये सेनेने सभापतीपद स्वत:कडे ठेवत भाजपला उपसभापती पदाची खुर्ची दिली आहे.

कल्याण आणि अंबरनाथ तालुका पंचायत समिती सभापती-उपसभापतीपदाची निवडणूक घेण्यात आली. कल्याणमध्ये भाजपचे 5, शिवसेनेचे 4, राष्ट्रवादीचे 3 असे पंचायत समिती सदस्य आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीत ठरल्यानुसार सभापतीपद आणि उपसभापतीपद राष्ट्रवादीला देण्यात येणार होते.

आजोबा होण्याच्या वयात झाले बाबा, उद्योजकाच्या तिसऱ्या पत्नीने दिला गोंडस मुलाला जन्म

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये ठरल्यानुसार शिवसेनेचे सभापती व उपसभापतीपदाचे उमेदवार रविवारी अर्ज मागे घेणार होते. मात्र मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरे आणि शिवसेना नेत्यांची रविवारी सकाळी गुफ्तगू झाली आणि राष्ट्रवादीला दोन्ही पदे देण्याऐवजी भाजपने शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!