Share

प्रवीण तरडेंनी केली नव्या सिनेमाची घोषणा

Published On: 

मुंबई : सद्या जगभर कोरोना महामारीने थैमान घातले आहे, त्यानंतर सुरु झालेल्या लॉकडाउनमुळे जवळपास तीन महिने मालिकांचं शूटिंग बंद होतं. मात्र आता काही अटीशर्तींचे पालन करत या शूटिंगला सुरुवात झाली आहे. अनेक मालिकांचे शूटिंग सुरु झाले आहे, तसेच अनेक सिनेमे हे डिजिटल माध्यमातून रिलीझ केले जात आहे. आता मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे यांनी नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.

प्रवीण तरडे यांनी काल (दि .५ जुलै) रोजी फेसबुक लाइव्हद्वारे त्यांच्या आगामी ‘देऊळ बंद 2’ या चित्रपटाची घोषणा केली. यावेळी चित्रपटाचे निर्माते देखील उपस्थित होते. विशेष म्हणजे रविवारी गुरुपौर्णिमा असल्याच्या निमित्ताने या चित्रपटाची घोषणा करण्यासाठी अन्य कोणताही चांगला दिवस नसल्याचं म्हणत त्यांनी ही घोषणा केली आहे.

“आज गुरुपौर्णिमेला आपण ‘देऊळ बंद 2.. आता परीक्षा देवाची’ या नव्या चित्रपटाची घोषणा करतोय. या घोषणेसाठी आजच्या इतका दुसरा कोणता पवित्र दिवस नसावा”,असं प्रवीण तरडे म्हणाले, तर “आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण ‘देऊळ बंद 2.. आता परीक्षा देवाची’ या नव्या चित्रपटाला सुरुवात करतोय आणि पुढील गुरुपौर्णिमेपर्यंत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल”, असं चित्रपटाच्या निर्मात्या जुईली वाणी – परदेशी यांनी सांगितलं तसेच ‘गेल्या वेळी स्वामींना शास्त्रज्ञ भेटले होते…यावेळी स्वामींना शेतकरी भेटणार आहे. हा पण सिनेमाही हिट होईल,’ असा विश्वास चित्रपटाच्या निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.

या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रवीण तरडे करत असून निर्मिती जयश्री कैलास वाणी आणि जुईली वाणी-सूर्यवंशी करणार आहेत. आणि हा चित्रपट पुढच्या गुरुपौर्णिमेला म्हणजेच २३ जुलै २०२१ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र अद्यापतरी या चित्रपटातील कलाकारांची नावं मात्र गुलदस्त्यातच आहेत.

यापूर्वीच्या ‘देऊळ बंद’ या चित्रपटात गश्मीर महाजनी आणि मोहन जोशी मुख्य भूमिकेत झळकले होते.

ऐतिहासिक कर्जमाफी : ठाकरे सरकारवर कौतुकाचा वर्षाव !

करोनाविरुद्धच्या लढाईसाठी BCCIने दिले तब्बल ‘एवढे’ कोटी

मुस्लिम आरक्षणाने ओबीसी, मराठा आरक्षण धोक्यात – फडणवीस

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!