🕒 1 min read
पुणे : मराठी सिनेमा आणि टेलिव्हीजन इंडस्ट्रीत कला दिग्दर्शक राजू साप्ते यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आल्यानंतर मनोरंजन सृष्टीला मोठा धक्का बसला आहे. राजू साप्ते यांनी आपल्या पुण्यातील घरात आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ तयार केला आहे. त्यामध्ये त्यांनी आत्महत्येचं कारण सांगितल आहे होते. या प्रकरणी आता नरेश मिस्त्रीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
परंतु आता या प्रकरणी फरार असलेला मुख्य आरोपी राकेश मौर्या याला आज पुणे पोलिसांनी अटक केली आहे. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरच्या पिंपरी परिसरातील एका हॉटेलमध्ये आरोपी राकेश मौर्या आला असता त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणी आत्तापर्यंत ४ आरोपींना अटक करण्यात आली असून एकूण ९ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
राकेश मोर्या हा संबंधित हॉटेलमध्ये अटकपूर्व जामीन मिळवण्यासंदर्भात वकिलाशी बोलणी करण्यासाठी आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तातडीने पावलं उचलत त्याला अटक केली आहे. राजेश साप्ते यांनी ३ जुलै रोजी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली होती.
तसेच, एक व्हिडीओ देखील रेकॉर्ड केला होता. यामध्ये त्यांनी आपल्याला त्रास देणाऱ्या व्यक्तींची नावं घेतली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाच आरोपींनी राजेश साप्ते यांना जीव मारण्याची धमकी देखील दिली होती. लेबरला कामावर येऊ देणार नाही, व्यावसायिक नुकसान करू अशी धमकी दिल्याची तक्रार राजेश साप्ते यांच्या पत्नी सोनाली साप्ते यांनी फिर्यादीत केली होती.
महत्वाच्या बातम्या
- ‘एकीकडे कोरोनाचा उद्रेक तर तिकडे अशोकरावांचे विराट आंदोलन, हे बरोबर आहे का ?’
- ‘नानांच्या नाना तऱ्हा; ते सकाळी एक बोलतात, दुपारी दुसरं आणि संध्याकाळी…’
- स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना शिवसेनेनं केली १० लाखांची मदत; एकनाथ शिंदेनी केलं कुटुंबियांच सांत्वन
- ‘मुंबई महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकेल’ ; भाजपचा विश्वास
- ‘जशी पुण्याची मस्तानी जगात भारी तसा आमचा मुख्यमंत्री जगात भारी’ ; मनसेचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
