🕒 1 min read
कोल्हापूर : मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केल्याने याचा मोठा फटका मराठा समाजाला बसला असून तीव्र नाराजीव्यक्त केली जात आहे. मराठा समाजाने विविध आंदोलने आणि निदर्शने देखील सुरु केली आहेत. तर, खासदार संभाजीराजे छत्रपती हे देखील मराठा आरक्षणासाठी सक्रिय झाले आहेत.
कायदा रद्द झाल्यानंतर संभाजीराजे यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. यानंतर, त्यांनी महाराष्ट्र दौरा करून मूक मोर्चा सुरु देखील केला. तर, राज्य सरकारशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर आणि कोरोनाचा धोका लक्षात घेता त्यांनी मूक आंदोलनाला तूर्तास स्थगिती दिली आहे. दरम्यान, कोरोनाची स्थिती असल्याने मराठा समाजाने संयम पाळावा असं आवाहन राज्य सरकार आणि मंत्र्यांतर्फे करण्यात येत होतं.
आता हेच मंत्री कोरोना स्थितीला बगल देऊन केंद्र सरकारविरोधात महागाई आणि इतर कारणांवरून आंदोलन करत आहेत, मोर्चे करत आहेत. त्यामुळे संभाजीराजे यांनी या मंत्र्यांच्या आंदोलनावर आक्षेप घेत आता कोरोनाच्या स्थितीत यांचे आंदोलन सुरु आहे, हे बरोबर आहे का ? असा सवाल करत संताप व्यक्त केला आहे.
https://twitter.com/YuvrajSambhaji/status/1415591095749148674?s=20
‘एकीकडे कोरोनाचा उद्रेक तर दुसरीकडे अशोकरावांचे आंदोलन…त्यात ते म्हणताय विराट मोर्चा झाला, जोरदार आंदोलन पार पडले अणि त्यात सहभागी झालेल्या नागरिक आणि लहान मुलांचे आभार मानले. आता हे बरोबर आहे का?,’ असं ट्विट संभाजीराजे यांनी केलं आहे. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात नांदेड येथे केंद्र सरकार विरोध आंदोलन करण्यात आले असता यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यावरून संभाजीराजे यांनी मंत्री अशोक चव्हाण आणि राज्य सरकारवर संताप व्यक्त केला आहे.
https://twitter.com/AshokChavanINC/status/1415556829032062976?s=20
महत्वाच्या बातम्या
- ‘उद्धव ठाकरे लोकप्रिय मुख्यमंत्री, तर वाझे टॉलस्टॉय आणि राहुल गांधी हे आजचे तेनाली रामन’
- ‘नानांच्या नाना तऱ्हा; ते सकाळी एक बोलतात, दुपारी दुसरं आणि संध्याकाळी…’
- स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना शिवसेनेनं केली १० लाखांची मदत; एकनाथ शिंदेनी केलं कुटुंबियांच सांत्वन
- ‘मुंबई महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकेल’ ; भाजपचा विश्वास
- ‘जशी पुण्याची मस्तानी जगात भारी तसा आमचा मुख्यमंत्री जगात भारी’ ; मनसेचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
