Share

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूकीकडे ‘मविआ’ने संकट म्हणून नव्हे तर एक संधी म्हणून पाहण्याची गरज

Published On: 

🕒 1 min read

 मुंबई : राज्याचं पावसाळी अधिवेशन येत्या पाच आणि सहा जुलैला होत आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवड होणार आहे. हे पद रिक्त असल्याने भाजपने थेट राज्यपालांकडे धाव घेऊन, तातडीने अध्यक्षांची निवड कऱण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता काँग्रेसकडून ही निवड याच अधिवेशनात होणार असल्याची माहिती दिली. काँग्रेसचाच अध्यक्ष होईल आणि याच अधिवेशनात ती निवड होईल असा विश्वास कॉंग्रेसच्या नेत्यांना वाटत आहे.

या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांनी तयारी सुरु केली आहे. महाविकास आघाडीती काही पक्षांनी आपआपल्या आमदारांना व्हिप बजावला आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड होणार असून या निवडीवेळी दगाफटका होऊ नये, यासाठी महाविकास आघाडीकडून सावध पावलं टाकली जात आहेत. त्यासाठी तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आपआपल्या आमदारांना फोन करुनही अधिवेशनाला हजर राहण्यासाठी बजावलं आहे.

काँग्रेसच्या वाट्याला असलेलं विधानसभा अध्यक्ष पदासाठी काँग्रेसमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि पुणे जिल्ह्यातील भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्यात स्पर्धा आहे. दरम्यान, भाजप ही निवडणूक लढवणार का किंवा उमेदवार कोण असणार याबाबत कोणतीही माहिती सध्या दिली जात नसल्याचे दिसून येत आहे. भाजपने आक्रमक भूमिका घेतली असली तरीही आपले पत्ते खुले केले नसल्याचे दिसत आहे.

गुप्त मतदान झाले तर दोन्ही बाजूकडून दगाफटका देखील होऊ शकेल अशी स्थिती आहे. केवळ महाविकास आघाडीच नव्हे तर भाजपची देखील मते फुटू शकतात असे बोलले जात आहे. महाविकास आघाडीकडे असणारे संख्याबळ पाहता त्यांचा विजय होणार हे मानले जात आहे. मते फुटली नाहीत तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय होणार हे निश्चित आहे. मात्र भाजपची अतिरिक्त मते फोडून महाविकास आघाडीला आपली एकजूट आणि आपली ताकत दाखवून देण्याची देखील संधी मिळणार आहे. यामुळेच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूकीकडे महाविकास आघाडीने संकट नव्हे तर एक संधी म्हणून पाहण्याची गरज आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!