मुंबई : राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असला तरी कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन कापूस खरेदी केंद्रं सुरु करण्यात आली आहेत. खरेदी केंद्रांना लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये काही अडचणी येत आहेत. त्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाने खरेदी केंद्र आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सहकार्य करावे, अशा सूचना सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिल्या.
आज मंत्रालयात राज्यातील कापूस खरेदी केंद्रांच्या अडचणींसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कापूस खरेदी केंद्रांनी सोशल डिस्टन्सिंग व आवश्यक त्या सर्व उपाययोजनांसह नियमांचे पालन करुन कापूस खरेदी करावी. शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर कापूस घेऊन जात असताना काही अडचणी आल्यास स्थानिक प्रशासनाची मदत घ्यावी असे बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबत शासन संवेदनशील असून लॉकडाऊनच्या कालावधीतसुद्धा कापूस खरेदी केंद्रे सुरु केली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करु नये, असे आवाहनही बाळासाहेब पाटील यांनी केले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

