मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकारमधील संघर्ष वारंवार पाहायला मिळत आहे. नुकतेच राज्यपालांनी साकीनाका प्रकरणावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गंभीर पाऊल उचलण्याचे निर्देश दिले होते. तर, मुख्यमंत्र्यांनी देखील राज्यपालांना पत्र लिहून जशास तसं उत्तर दिले. या पत्रावरून काल दिवसभर महाविकास आघाडी आणि भाजपमधील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगल्याचं दिसून आलं.
आता माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या पत्रावर खोचक टिपण्णी करत कान टोचले आहेत. ‘मुख्यमंत्री कार्यालयात काही सल्लागार आणि अधिकारी अपरिपक्व आहेत. मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारचे पत्र पाठविताना खातरजमा करावी,’ असा सल्ला फडणवीस यांनी दिला आहे.
कोणत्याही पक्षाकडून राज्यपालांना मागण्यांचे पत्र मिळाल्यानंतर राजपाल सरकारला एक पत्र लिहितात. या पक्षाच्या अशा मागण्या आहेत, तुम्ही त्यावर काय कारवाई करणार? अशा विचारणा केली जाते. शक्ती कायद्यासाठी राज्यपालांनी विचारणा केली. राज्यपालांनी आदेश दिले नाहीत, तर त्यांनी सूचना केली आहे. मात्र, त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री कार्यालयाने अपरिपक्वता दाखविली. मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना आदेश महिला सुरक्षा अधिक कडक करण्याचे आदेश द्यायला पाहिजे होते. शक्ती कायद्यावर लवकर निर्णय करण्याचा विचार करू, असे म्हटले असते तर ते अधिक संवेदनशील दिसलं असतं. मात्र, राज्य सरकारकडून त्याला राजकीय रंग दिले गेले. मुख्यमंत्र्यांनी इतकं व्यक्त होणं हे पहिल्यांदा राज्यात घडलं, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी आज माध्यमांना दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मुंद्रा पोर्टवरील ३००० किलो ड्रग्ज प्रकरणात अदानी समूहाने दिले स्पष्टीकरण, म्हणाले…
- आरोग्य विभागाच्या भरतीचे प्रवेश पत्र पुढील दोन दिवसात विद्यार्थ्यांना मिळणार; युवासेनेच्या पाठपुराव्याला आले यश
- ‘महंत नरेंद्र गिरींची आत्महत्या नव्हे, त्यांची हत्या झालीय’; भाजपा खा. साक्षी महाराजांचा दावा
- अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी भाजपचे ‘ठाकरे’ सरकारविरोधात निदर्शने
- सलमान खान सोबत काम करतांना जॅकी उर्फ जग्गुदादाला असा आला अनुभव..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

