Share

‘महंत नरेंद्र गिरींची आत्महत्या नव्हे, त्यांची हत्या झालीय’; भाजपा खा. साक्षी महाराजांचा दावा

Published On: 

नवी दिल्ली : आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह संदिग्ध अवस्थेत सापडला होता. महंत नरेंद्र गिरी यांच्या अल्लापूर या येथील बाघंबरी या ठिकाणच्या निवासस्थानी हा मृतदेह सापडला असून पंख्याला लटकून त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येतंय. त्या ठिकाणी सापडलेल्या सुसाईड नोटवरुन पोलिसांनी महंत नरेंद्र गिरी यांचा शिष्य आनंद गिरी याला अटक केली आहे.

याच दरम्यान भारतीय जनता पक्षाचे खासदार साक्षी महाराज यांनी खळबळजनक दावा केला आहे. ‘महंत नरेंद्र गिरी यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट बनावट आहे. नरेंद्र गिरी आत्महत्या करूच शकत नाहीत. त्याची हत्या करण्यात आली आहे’ असा आरोप त्यांनी केलाय. नरेंद्र गिरींच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआयद्वारे संपूर्ण चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दरम्यान, महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूचे रहस्य अजूनही कायम आहे. पोलिस या प्रकरणाशी संबंधित सीडी, सुसाइड नोट, व्हिडिओचा तपास करत आहेत. उत्तर प्रदेश सरकारने १८ सदस्यांचे विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. पाच डॉक्टरांचे पॅनलही तयार करण्यात आले आहे. हे पॅनल महंतांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टेम करणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!