औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी तहसील कार्यालयासमोर भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य निदर्शने करण्यात आली. यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिक, शेतकरी, कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नेतृत्व प्रदेश चिटणीस इद्रीस मुलतानी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश बनकर, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे यांनी केले. यावेळी ठाकरे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
मका, कपाशी, मिरची, अद्रक, मूग, सोयाबीन आदी पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे वीज बिल थकलेले आहे. ते माफ करावे, मागच्या वर्षीही शेजारील तालुक्यांना नुकसान भरपाईचे पैसे मिळाले आणि सिल्लोड तालुक्यात प्रशासनाच्या चुकीमुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही.
असा दावा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. ही चूक अधिकाऱ्यांची आहे तर सत्ताधारी अधिकाऱ्यांना तात्काळ का निलंबित करत नाही, त्यांना तात्काळ निलंबित करा शेतकऱ्यांना लवकरात लवकर हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाईची मदत करावी अशी मागणी करण्यात आली. मागणी मान्य न झाल्यास तहसील कार्यालयासमोर हजारोंच्या संख्येने आमरण उपोषण करण्यात येईल. असा इशारा यावेळी देण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या
- मुंद्रा पोर्टवरील ३००० किलो ड्रग्ज प्रकरणात अदानी समूहाने दिले स्पष्टीकरण, म्हणाले…
- आरोग्य विभागाच्या भरतीचे प्रवेश पत्र पुढील दोन दिवसात विद्यार्थ्यांना मिळणार; युवासेनेच्या पाठपुराव्याला आले यश
- ‘राज्याची अब्रू दिल्लीच्या वेशीवर टांगण्याचा प्रयत्न कशासाठी? ‘भाजप’ महिलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- ‘या प्रस्थापितांच्या सरकारला ओबीसींना आरक्षण द्यायचे नाही हे पुन्हा सिद्ध झाले’
- सलमान खान सोबत काम करतांना जॅकी उर्फ जग्गुदादाला असा आला अनुभव..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

