Share

एक हात मदतीचा : ‘लवळे’करांनी गरजू व्यक्तींना धान्य वाटप करण्याचा राबवला उपक्रम

Published On: 

🕒 1 min read

लवळे : संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्याने गावातील गरीब व रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबाला दोन वेळेच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच गरजू लोकांसाठी अनेक मदतीचे हात देखील पुढे येत आहे. तसेच आता ग्रामीण भागातही ग्रामस्थ, ग्रामपंचायत, गावातील अनेक संस्था मदत करण्यास सरसवल्या आहेत.

याच पार्श्वभूमीवर ‘लवळे ग्रामपंचायत’ने देखील धान्य स्वरुपात गावातील गरजू नागरिकांना धान्य वाटप करण्याचा उपक्रम राबवला आहे. तसेच गरजूंना मदत म्हणून गावातील ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणात धान्य ‘ग्रामपंचायत लवळे कार्यालयात’ जमा होत आहे. विशेष म्हणजे या उपक्रमामध्ये युवा कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग आहे.

 

तसेच ‘मदत म्हणून आपण किमान ५ किलो तांदूळ आणि २ किलो डाळ अशी मदत करावी, असं आवाहन ‘लवळे ग्रामपंचायत’ने सोशल मिडीयाच्या माध्यमांतून केलं होतं. ‘लवळे’करांनी याला चांगला प्रतिसाद दिला आहे. तसेच जमा झालेलं धान्य प्रत्येकी एका कुटुंबाला ५ किलो देणार असल्याची माहिती ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी दिली आहे.

दरम्यान, जीवनावश्यक वस्तूंसाठी नागरिकांनी गर्दी करू नका, ‘कोरोना’शी दोन हात करण्यासाठी प्रत्येकांनी आरोग्याची काळजी घ्या, ‘लॉकडाऊन’ला चांगला प्रतिसाद घ्या, पोलिसांना सहकार्य करा,’ असं आवाहन ‘लवळे ग्रामपंचायत’ने केलं आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!