सांगली : गेले ५ महिने कोरोनाने राज्यात कहर माजवला आहे. आतापर्यंत राज्यातील अनेक लोकप्राधिनिधी, समाजसेवक, मंत्री ते बॉलिवूड स्टार्स पर्यंत अनेकांना कोरोनाने विळखा घातला आहे. आता, राष्ट्रवादीचे दिवंगत नेते व राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या मुलाला कोरोना झाल्याचे काल रात्री समोर आले.
कै. आबा पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांना देखील आता कोरोना झाला आहे. त्यांच्यासह आबांचे भाऊ सुरेश पाटील यांचा देखील कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर, रोहित पाटील यांच्या मातोश्री व आबा पाटील यांच्या पत्नी आमदार सुमनताई पाटील यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
‘उचलली जीभ आणि लावली टाळ्याला’ ; कंगना रणौतच्या वक्तव्यावर रेणुका शहाणेंनी व्यक्त केला संताप!
दरम्यान, रोहित पाटील हे बुधवारी एका सार्वजनिक कार्यक्रमात पालकमंत्री जयंत पाटील, खासदार संजयकाका पाटील, जिल्हाधिकारी यांच्यासह अनेक नेत्यांच्या संपर्कात आले होते. त्यामुळे खळबळ उडाली आहे. सद्या, रोहित पाटील आणि सुरेश पाटील यांना कोणत्याही प्रकारचा त्रास नाही, त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना घरातच आयसोलेशन करण्यास सांगत उपचार सुरू केले आहे.


