🕒 1 min read
मुंबई : जेएनयू विद्यार्थी संघटनेचे नेते कन्हैया कुमार आणि गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी हे २ ऑक्टोबर रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश करणात आहेत. यावर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे. तमाम डावे, कट्टरवादी, लिबरल, जातवादी आदी बोगस जमातींचे अखेरचे मुक्तीस्थान हे काँग्रेस आहे. अशी टीका केली आहे.
कन्हैया कुमार आणि जग्नेश मेवानी हे २ ऑक्टोबरला काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. काँग्रेसने कन्हैया कुमार आणि जिग्नेश मवानी यांना उमेदवारी न देत विधानसभा निवडणुकीत मदत केली होती. मात्र काँग्रेसला या विधानसभा निवडणुकीत थोड्याच जागांवर समाधान मानावो लागले. आता काँग्रेस या दोघांना सोबत घेत नवा डाव टाकणार आहे. कन्हैया कुमारमुळे काँग्रेसला बिहारमध्ये सावरण्याची चांगली संधी मिळू शकते असे अनेक काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.
काँग्रेसची B टीम आता अधिकृतपणे काँग्रेसमध्ये दाखल होणार? तमाम डावे, कट्टरवादी, लिबरल, जातवादी आदी बोगस जमातींचे अखेरचे मुक्ती स्थान हे काँग्रेसच आहे. pic.twitter.com/dhCffoBlVk
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 26, 2021
या प्रवेशावर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी ट्विटरवर टीका केली आहे. भातखळकर म्हणाले,
‘काँग्रेसची बी टीम आता अधिकृतपणे काँग्रेसमध्ये दाखल होणार? तमाम डावे, कट्टरवादी, लिबरल, जातवादी आदी बोगस जमातींचे अखेरचे मुक्ती स्थान हे काँग्रेसच आहे.’ अशी टीका भातखळकरांनी काँग्रेसवर केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘त्या’ पत्रामुळे चंद्रकांतदादांचंच धोतर सुटलंय; चंद्रकांत पाटील राऊतांच्या निशाण्यावर
- चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांचा खोचक टोला
- देशात धर्माच्या नावावर दिली जाणारी अफूची गोळी सर्वांवर परिणाम करत आहे – छगन भुजबळ
- ‘..तर शिवसेनेच्या मंत्र्यांना उस्मानाबाद जिल्हा बंदी करणार’, भाजप आ.राणा पाटलांचा इशारा
- ‘अफगाणिस्तानच्या भूमीवर दहशतवाद नको, त्याचा फटका तुम्हालाही बसणार’, मोदींचा पाकिस्तानला इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
