मुंबई : आयपीएलमध्ये गुरुवारी झालेल्या सामन्यात विराट कोहलीच्या रॉयल्स चॅलेंजर बेंगळुरुने राजस्थान रॉयल संघाचा १० गडी राखुन पराभव केला. या विजयासह आरसीबीची विजयी घौडदौड कायम आहे. आरसीबी संघाचा स्पर्धेतील हा सलग चौथा विजय आहे.
राजस्थान रॉयल्सने दिलेल्या १७८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबी संघाने १८१ धावांची विजयी सलामी देत १० गडी राखुन विजय मिळवला. या सलामी भागीदारीसह आयपीएलमध्ये सर्वाधिक धावांची सलामी देणारी चौथ्या क्रंमाकाची जोडी बनली आहे. पडीक्कलने ५२ चेंडूत नाबाद १०१ तर, विराटने ४७ चेंडूत नाबाद ७२ धावांची खेळी केली.
आयपीएलमध्ये सलामीसाठी सर्वाधिक धावांच्या विक्रमात पहिल्या क्रमांकावर सनरायझर्स हैदराबाद संघाचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो हे आहे. या दोघांनी २०१९ मध्ये आरसीबीविरुद्ध १८५ धावांची भागीदारी केली होती. तर दुसऱ्या क्रमांकावर केकेआरच्या गौतम गंभीर आणि ख्रिस लिन यांनी २०१७ मध्ये गुजरात लायन्स विरुद्ध १८४ धावा केल्या होत्या. तिसऱ्या क्रमांकावर मयंक अग्रवाल व केएल राहुल यांनी २०२० मध्ये राजस्थान रॉयल्स विरूद्ध खेळताना १८१ धावा केल्या होत्या. तर चौथ्या क्रमांकावर पडिक्कल-कोहली सोबत २०२०मध्ये शेन वॉटसन आणि फाफ डू प्लेसीस सलामीवीरांचा नंबर लागतो. या दोघांनी पंजाब विरुद्ध नाबाद १८१ धावा ठोकल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या
- …आणि सुरेश रैनानं धरले भज्जीचे पाय : पहा व्हिडीओ
- दोन लाख रूपयांसाठी विवाहितेचा छळ
- रेकॉर्डवरील गुन्हेगार अटकेत
- राज्यात पुन्हा एकदा प्रवास करण्यासाठी ई- पासची गरज, महाराष्ट्र पोलिसांची माहिती
- कमळापूर रोडवर एटीएम फोडण्याचा प्रयत्न, चोरटे सीसीटीव्हीत कैद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

