औरंगाबाद : नवीन वाहन घेण्यासाठी माहेरून दोन लाख रूपये आण अशी मागणी करून विवाहितेचा छळ केल्या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून विवाहितेचा पती रामा भगवन ससाने (रा. अहमदनगर) याच्यासह सासरकडील तीन जणांविरूध्द तक्रार देण्यात आली आहे.
काही वर्षांपूर्वी तक्रारदार महिलेचे लग्न ससाने यांच्याशी झाले होते. सुरुवातीला ससाने यांनी तक्रारदार महिलेला चांगले नांदवले. मधल्या काळात त्यांचे चांगलेच खटके उडू लागले. तक्रारदार महिलेने हि बाब आपल्या माहेरी सांगितली. याचाच राग भारत रामा ससाने याने तक्रारदार महिलेला वाहन खरेदीसाठी दोन लाखाची मागणी करण्यास सुरुवात केली.
काही दिवस महिलेने ससाने यांचा शारीरिक आणि मानसिक त्रास सहन केला. परंतु त्यांच्याकडून वारंवार दोन लाख रुपयांच्या मागणीला कंटाळून तक्रारदार महिलेले पोलीस स्टेशन गाठले. या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री ठाकरेंकडून विरार घटनेच्या चौकशीचे आदेश
- ‘विरारसारख्या घटना वारंवार घडताहेत, कठोर पावलं उचलणे गरजेचे’, मंत्री वर्षा गायकवाड यांचे ट्विट
- कोरोना परिस्थितीवर पंतप्रधान मोदींची आज उच्चस्तरीय बैठक
- धक्कादायक बातमी : विरारमध्ये कोव्हिड रुग्णालयाला मध्यरात्री भीषण आग, १३ रुग्णांचा मृत्यू
- ‘हवं तर मी तुमच्या पाया पडतो पण महाराष्ट्राला रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन द्या!’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
