मुंबई : भारतात सध्या आयपीएलचा रणसंग्राम सुरु आहे. तसेच या आयपीएलमध्ये वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळत आहेत. कधी गुरू शिष्य आमने-सामने तर कधी फॅन असलेल्या विरुद्ध संघातील खेळाडूनं आपल्या जर्सीवर ऑटोग्राफ घेतली. सख्खे भाऊ एकमेकांन विरोधात देखील खेळताना दिसले. याच दरम्यान नुकत्याच झालेल्या एक किस्सा सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये सुरेश रैनानं हरभजन सिंग दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता कोलाकाता विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स सामन्यादरम्यान सुरेश रैनानं हरभजन सिंगचे पाया पडून आशीर्वाद घेतले. हा खास क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हरभजन सिंगने त्याला जवळ घेऊन घट्ट मिठी मारली.
https://twitter.com/sportzhustle/status/1384868204816723976?s=20
दोघांचा हा सुदंर क्षण पाहून सर्वत्र या व्हिडिओची स्तुती होत आहे. सुरेश रैना मधील हरभजन सिंगबद्दल इतका आदर पाहून माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण म्हणाला की, ‘हा खूप सुंदर क्षण आहे. जेव्हा आपण बर्याच वर्ष एकत्र खेळता, विश्वचषक जिंकला, तेव्हा एक प्रेम आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री ठाकरेंकडून विरार घटनेच्या चौकशीचे आदेश
- ‘विरारसारख्या घटना वारंवार घडताहेत, कठोर पावलं उचलणे गरजेचे’, मंत्री वर्षा गायकवाड यांचे ट्विट
- कोरोना परिस्थितीवर पंतप्रधान मोदींची आज उच्चस्तरीय बैठक
- धक्कादायक बातमी : विरारमध्ये कोव्हिड रुग्णालयाला मध्यरात्री भीषण आग, १३ रुग्णांचा मृत्यू
- ‘हवं तर मी तुमच्या पाया पडतो पण महाराष्ट्राला रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन द्या!’


