🕒 1 min read
ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियावर शानदार कसोटी मालिकेत विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया आज भारतात परतली. या दौऱ्यात भारताने ऐतिहासिक विजय मिळवला. या दौऱ्याचा शेवट ब्रिस्बेन येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध शेवटचा कसोटी सामना जिंकत भारतीय संघाने गोड केला. विशेष या सामन्यात भारताने ३ विके्टसने विजय मिळवत इतिहास रचला आहे.
या विजयासह भारताने २-१ ही मालिका जिंकली आहे. भारताचा हा ऑस्ट्रेलियन भूमीतील सलग दुसरा मालिका विजय आहे. याचबरोबर गेल्या ३३ वर्षांचा ऑस्ट्रेलियाचा ब्रिस्बेन कसोटीत अपराजित राहण्याचा विक्रमही भारताने खंडीत केला आहे. ब्रिस्बेन येथे भारताने मिळवलेल्या विजयात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने महत्वाची भूमिका बजावली. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सिराजने तीन सामन्यांत १३ विकेट घेतल्या. या मालिकेत भारताकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो अव्वल स्थानावर राहिला. तो या कामगिरीवर खुश असून त्याने स्वतःला नवी ‘बीएमडब्ल्यू’ कार गिफ्ट केली आहे. त्याने इंस्टाग्राम स्टोरीवर या लक्झरी कारचा फोटो शेअर केला.
ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक कामगिरीनानंतर भारताचे खेळाडू गुरुवारी मायदेशी परतले. सिराज भारतात परतल्यावर घरी न जाता, एअरपोर्टहून थेट दफनभूमीत गेला. तिथे जाऊन त्याने वडिलांच्या कबरीचे दर्शन घेतले. सिराजचे वडील मोहम्मद घौस यांचे २० डिसेंबरला निधन झाले. मात्र, क्वारंटाईनच्या नियमांमुळे सिराजने मायदेशात न परतण्याचा निर्णय घेतला होता.
महत्वाच्या बातम्या
- कोरोनाचे संकट अद्याप संपले नसल्याने शिवजयंती उत्सवही सुरक्षित वातावरणात साजरा करा – अजित पवार
- कोरोनालसीबाबत सत्य न तपासता आरोप करणे पडले महागात; हरभजनला मागावी लागली माफी
- शिवनेरी गडावर करण्यात येणारी विकासकामे दर्जेदार होतील याची दक्षता घ्या – अजित पवार
- आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची जयंती, राज आणि उद्धव ठाकरे येणार एकाच मंचावर !
- मोठी बातमी : राज्यातील बर्ड फ्लू नुकसानग्रस्तांना भरपाई देणार, पशुसंवर्धनमंत्र्यांची घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
