मुंबई : कोरोना लसीकरण सुरू झाले आणिजगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाच काऊंट डाऊन सुरू झाल. गेल्या 2 महिन्यापासून जगातील अमेरिका, इंग्लंड, आणि आता आज पासून भारतात देखील कोरोना लसीकरण सुरू झालं आहे. या सकारात्मक बातमीमुळे जगभरात आनंदाचं वातावरण आहे. मात्र, यादरम्यानच क्रिकेटर हरभजन सिंगने कोरोना लस संदर्भात एक वादग्रस्त ट्विट करून सर्वांचा रोष ओढवून घेतला आहे. मात्र आपली चूक समजल्यानंतर त्याने जाहीर माफी देखील मागितली आहे.
हरभजनने प्रथमता एक फोटो शेअर करत ट्विट केले की, ” वास्तवात अशाप्रकारे आपले अधिकारी स्वतः कोरोना लस न घेता, केवळ लस घेतल्याचा फोटो प्रसिद्ध करत दिखावा करत आहे.” हरभजनने केलेल्या ट्विटमध्ये एक महिला अधिकारी कोरोना लस न घेता केवळ फोटो प्रसिद्ध करत होती. मात्र हरभजनच्या या ट्विटवर चाहत्यांनी प्रचंड टीका करत हे ट्विट चुकीचे असल्याचे त्याच्या निदर्शनास आणून दिले. अनेक ट्विटर वापरकर्त्यांनी हरभजनला यासंदर्भात ट्रोल करण्यास देखील सुरुवात केली होती.
My Apologies guys didn’t check the facts ???????? https://t.co/UvwPSkIm0m
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) January 22, 2021
काही कालावधीनंतर हरभजनला आपली चूक लक्षात आली व त्याने सर्वांची माफी देखील मागितली आहे. हरभजन ने स्पष्ट केले की, आपण पूर्ण सत्यता जाणून न घेता ट्विट केले होते. हरभजनने शेअर केलेल्या फोटोमधील अधिकाऱ्यांची संपूर्ण माहिती मिळवली असता लक्षात आले की, त्या अधिकाऱ्यांनी वास्तवात लस घेतलेली आहे. अधिकाऱ्यांनी केवळ जनजागृतीसाठी तशा प्रकारे फोटो काढलेला होता.
याआधी देखील हरभजनने कोरोना लसीवर ट्विट केले होते की, खरंच भारतीयांना कोरोना लसीची गरज आहे का? असा सवाल करणारे ट्विट केले होते. त्यावरून देखील नेटिझन्सनी भारताच्या फिरकीपटूचा गणिताचा क्लास भरवला होता.
महत्वाच्या बातम्या
- फडणवीसांनी केलेल्या समजुतीच्या प्रयत्नानंतर देखील अण्णांचा बाणा कायम !
- शेतकरी नेत्यांना चर्चेत रस नाही; कृषिमंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
- ‘थोरातच काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी राहिले तर काँग्रेस स्वबळावर सरकार बनवल्याशिवाय राहणार नाही’
- सिनेमातील ‘नायक’ सत्यातील ‘सृष्टी गोस्वामी’; एक दिवसाची मुख्यमंत्री बनण्याचा मान विद्यार्थिनीला !
- मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या – रामदास आठवले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

