अहमदनगर : ‘करोना बाधितांची संख्या वाढतेय, हा काळजी वाटणाराच विषय आहे. त्यात दुमत काहीच नाही. त्यामुळे याबाबत लोकांमध्ये प्रबोधन करून त्यांना शिक्षित करणे व सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे बंधनकारक करणे गरजेचे आहे.महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणी जे मास्क वापरत नसतील, सोशल डिस्टन्सिंग पाळत नसतील, त्यांना कुठेतरी दंड लावावच लागेल. तशी परिस्थिती निर्माण झाली आहे,’ असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.
लॉकडाऊनवरही टोपे यांनी आपले स्पष्ट मत मांडले. महाराष्ट्रातील करोना बाधितांचा आकडा हा आज दहा लाखांच्या पुढे गेला आहे. त्याबाबत टोपे यांना विचारले असता ते म्हणाले, ‘करोनाची संख्या ही दहा लाखांच्या पुढे गेली असली तरी त्यामध्ये साडेसात लाख हे लोक बरे होऊन घरी गेले आहेत. दहा लाखांचा आकडा हा लक्षात ठेवण्यापेक्षा अॅक्टिव्ह पेशंट किती आहेत, हे लक्षात घ्यावे.
बंदच्या काळात आरोग्य सुविधा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून कालावधी मिळतो. त्यामुळे जेथे जेथे स्थानिक प्रशासन, तेथील पालकमंत्री, लोकप्रतिनिधी यांना वाटत असेल, त्याठिकाणी ते छोट्या कालावधीचा जनता कर्फ्यू करण्याच्या दृष्टिकोनातून स्थानिक पातळीवर विचार करतात. परंतु संपूर्ण लॉकडाऊन करणे हा आता विषय राहिला नाही. आपण आता अनलॉक करण्याचे कामच टप्प्याटप्याने करीत आहोत.’
महत्वाच्या बातम्या:-
- ‘अयोध्या कोणाच्या बापाच्या मालकीची नाही, विश्व हिंदू परिषदेने जास्त वळवळ करु नये’
- …नाहीतर मराठा तरुण नक्षलवादाच्या मार्गावर जातील, संभाजी ब्रिगेडचा गंभीर इशारा
- उद्धव ठाकरेंचे व्यंगचित्र फॉरवर्ड केले म्हणून माजी नौदल अधिकाऱ्यास मारहाण; महाराष्ट्रात ‘गुंडाराज’ – प्रवीण दरेकर
- वर्ध्यातील महिलांच्या अडचणी सोडविण्यासाठी खासदारांचा पुढाकार, बघा काय मिळणार सोयी
- होय… संघी चंद्रकांतदादांना हवं तसचं घडलंय, संतापलेल्या मराठा तरुणाचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

