टीम महाराष्ट्र देशा : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून आज राज्यातील शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे. २ हेक्टरपर्यंत असलेल्या खरीप पिकांसाठी प्रतिहेक्टरी ८ हजार रुपये देण्यात येणार आहेत. तर फळबागांसाठी प्रतिहेक्टरी १८ हजार रुपये मदत देण्याचा निर्णय राज्यपालांनी घेतला आहे. मात्र ही मदत अतिशय तुटपुंजी असल्याने विविध स्थरातून संताप व्यक्त केला जात आहे.
एका बाजूला हि परिस्थिती असताना आता विमा कंपन्यांनी सुद्धा हात वर केले आहे. पीक नुकसानीच्या पंचनाम्यास मान्यता देण्यास विमा कंपनी नकार देत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली असून कृषी विभागासही विमा कंपनी भीक घालत नसल्याने अभूतपूर्व स्थिती उद्भवली आहे.
अॅग्रिकल्चर इन्श्युरन्स कंपनी ऑफ इंडिया (एआयसी)तर्फे शेतमालाचा विमा काढला गेला. त्यापोटी शेतकऱ्यांनी लक्षावधी रूपयांचे हप्ते भरले. अडचणीत आल्यानंतर कंपनीच्या मदतीकडे शेतकरी आस लावून बसले होते. मात्र आता विमा कंपनीच नकार देत असल्याचे चित्र पुढे आले आहे. विदर्भातील अनेक जिल्हय़ात ही विमा कंपनी टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी आहेत.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1195961923864367104?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1195961503242838018?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

