मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग सापडत नाहीत. त्यामुळे ते फरार झालेत का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. तर ते युरोपातील देशात पळून गेले असतील, असा संशयही व्यक्त करण्यात येत आहे. कारण, चांदीवाल कमिशनने जारी केलेल्या जामीनपात्र वॉरंटनंतर पोलिसांनी सिंग यांना शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तपास यंत्रणांना परमबीर सिंग कुठे आहेत हे अजूनही शोधता आलेलं नाही.
एनआयएने अँटिलिया स्फोटकं तसंच मनसुख हिरेन हत्या प्रकरणात परमबीर सिंग यांना समन्स बजावलं होतं.सचिन वाझेच्या अटकेनंतर एप्रिल महिन्यात एनआयएने सर्वात प्रथम परमबीर सिंग यांचा जबाब नोंदवला होता. सचिन वाझेवर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईसंबंधी माहिती घेण्यासाठी हा जबाब नोंदवण्यात आला होता. प्रकरण उजेडात आलं होतं तेव्हा सचिन वाझे थेट परमबीर सिंग यांना रिपोर्ट करत होते. एनआयएने नुकतंच दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये परमबीर सिंग यांचाही सहभाग असल्याचे पुरावे मिळाल्याचा उल्लेख आहे.
एनआयएच्या सूत्रांनुसार, ऑगस्टमध्ये परमबीर सिंग यांना पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आलं होतं, मात्र त्यांनी उत्तर दिलं नाही. अधिकारी हरियाणात चंदीगड आणि रोहतकमधील त्यांच्या निवासस्थानीदेखील गेले होते, पण ते सापडले नाहीत. खंडणीचे गुन्हे दाखल झाल्यावर चौकशीला प्रतिसाद न दिल्याने ठाणे पोलिसांकडूनही लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. मात्र परमबीर सिंग नक्की आहेत कुठे, अशी चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांकडून कारवाईची शक्यता लक्षात घेऊन परमबीर सिंग यांनी काही दिवसांपूर्वी विदेशात पलायन केल्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
- शेतकऱ्याला ५० हजार रुपयांची मदत ताबडतोब जाहीर करा; राज ठाकरे यांची मागणी
- औरंगाबादेत शिवसेनेच्या माजी महापौरांच्या कन्येची कौतुकास्पद कामगिरी, युपीएससी परिक्षेत ५१९ वा रँक!
- तो आवाज माझा नाहीच हे विरोधकांचे कारस्थान; सुनिल कांबळेंचे स्पष्टीकरण
- काँग्रेसमध्ये धुसफूस सुरूच : कार्यकारी समितीची (सीडब्ल्यूसी) बैठक ताबडतोब बोलावण्याची गुलाम नबी आझाद यांची मागणी
- आपल्या पक्षाला राष्ट्रीय अध्यक्षच नाही, त्यामुळे निर्णय कोण घेतंय याची कल्पना नाही – सिब्बल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

