Share

“लाचार मुख्यमंत्र्यांची लाचार सभा, रश्मी ठाकरेंना कैदेत टाकल्यावर…”; नवनीत राणांचा घणाघात

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बीकेसीतील जाहीर सभेत अनेक मुद्द्यांवरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. यावर आता भाजप नेतेही पलटवार करत उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देत असताना पाहायला मिळत आहेत. मात्र, यातच आता खासदार नवनीत राणा यांनीही उद्धव ठाकरेंवर घणाघात केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राणा दाम्पत्यासह किरीट सोमय्या यांच्यावरही निशाणा साधला होता. मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणायला आलेले पळून गेले, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी राणा दाम्पत्यावर काल टीका केली होती. याला आता नवनीत राणा यांनी चांगलेच उत्तर दिले आहे.

नवनीत राणा दिल्लीत पत्रकारांशी बोलत असताना म्हणाल्या, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सत्ता जाईल आणि तेव्हा रश्मी ठाकरेंना तुरुंगात टाकले तर त्यांना मी कसे वाटते असे विचारणार आहे. ती वेळही लवकरच येणार आहे, जेव्हा तुमची सत्ता जाईल आणि तुमच्या घरातील महिला तुरुंगात जाईल. तसेच मुख्यमंत्र्यांनी गदा हातात न घेता त्याला करंट लागत असल्यासारखे वर्तन केले. उद्धव ठाकरेंनी गदेचा अपमान केला. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सभेत शेतकरी, बेरोजगारी, लोडशेडिंगबद्दल काहीही उल्लेख केला नाही. फक्त दुसऱ्यांवर बोलण्यासाठी ती सभा होती”.

“अडीच वर्षे मुख्यमंत्री कार्यालयात गेले नाहीत. मुख्यमंत्री विदर्भ, मराठवाड्यात गेल्याचे त्यांच्या मुलाने सांगितले. पण त्यांच्या दौऱ्याचा फक्त एकतरी व्हिडीओ त्यांनी जाहीर करावा. देवेंद्र फडणवीसांच्या सरकारनंतर तिप्पट प्रमाणात राज्यात बेरोजगारी वाढली आहे. औरंगजेबाच्या कबरीवर फूल वाहणाऱ्यांवर एक शब्द बोलले नाहीत. सत्तेत आल्यानंतर औरंगाबादचे नाव संभाजीनगर करायचं तुम्हीच म्हणाला होता. पण सभेत बोलताना त्याची काही गरज नाही म्हणता. एक नाव बदलू शकत नाहीत, इतके लाचार मुख्यमंत्री आहेत”, अशी टीका नवनीत राणा यांनी केली.

महत्वाच्या बातम्या –

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!