कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीनंतर भाजपच्या गोटातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात न जाता मातोश्रीवर बसून सर्व कारभार हाताळणे, कसे गरजेचे आहे, हे सांगितले होते.
मुख्यमंत्र्यांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. सध्या राज्यात दोन मुख्यमंत्री आहेत. एक मातोश्रीवर बसून काम करत आहेत आणि दुसरे राज्यभर फिरत आहेत, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. ते रविवारी पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
दरम्यान,पाटील यांनी केलेली टीका शिवसेनेला चांगलीच झोंबली आहे. पाटील यांना शिवसेनेचे नेते राजेश क्षीरसागर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मातोश्रीवर टीका करणाऱ्यांचा शेवट कसा होतो, हे नारायण राणे यांनी अनुभवले आहे. चंद्रकांत पाटील यांनी ही गोष्ट ध्यानात ठेवावी, असा इशारा क्षीरसागर यांनी दिला.
यावेळी राजेश क्षीरसागर म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांना युतीचा इतिहास माहीत नसेल. चंद्रकांत पाटील हे आंबा पडल्यासारखे पक्षात अचानक मोठे झाले आहेत. मातोश्रीवर टीका करणाऱ्यांचा शेवट कसा होतो, हे नारायण राणे यांनी अनुभवले आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी मातोश्रीवर विचारपूर्वक टीका करावी.
पुढे बोलताना ते म्हणाले, चंद्रकांत पाटील यांच्या टीकेमुळे उद्धव ठाकरे यांच्या कामावर कोणताही परिणाम होणार नाही. केवळ दिंडोरा पिटून राज्यकारभार होत नाही. उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांनी नरेंद्र मोदींनी गेल्या सहा वर्षात मीडियाला बाईट दिला का, हे सांगावे, असा सवाल क्षीरसागर यांनी उपस्थित केला.
महत्वाच्या बातम्या-
…ते शक्य नसल्यास इगतपुरीमध्ये जावून विपश्यना करावी; पाटील, फडणवीसांना आंबेडकरांचा खोचक सल्ला
आम्हाला काय म्हणायचं हे अजितदादांनी फोटोतून दाखवलं, भाजपच्या मित्रपक्षाचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

