Share

मला याची राजकीय किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण… राहुल गांधी

Published On: 

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भारत-चीन सीमावाद मुद्यावरून मोदी सरकार व भाजपावर निशाणा साधला आहे. काँग्रेसकडून सातत्यानं चीननं भारतीय भूप्रदेशात घुसखोरी केल्याचा आरोप होतं आहे , आता पुन्हा राहुल गांधी यांनी ट्विट करून आपली भूमिका मांडली आहे. “जे लोकं खोटं बोलत आहेत, ते देशभक्त असूच शकत नाही,” असं टीकास्त्र राहुल गांधी सोडलं आहे.

भारत-चीन सीमावादावरून दोन्ही देशांमध्ये लष्करी आणि राजनैतिक पातळीवर चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. दुसरीकडे मागील काही दिवसांपासून राहुल गांधी व्हिडीओ ट्विट करून आपली भूमिका मांडत आहेत. राहुल गांधी यांनी नवीन व्हिडीओ शेअर केला असून, त्यात त्यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. “एक भारतीय म्हणून माझी पहिली प्राथमिक देश आणि देशातील जनता आहे. हे एकदम स्पष्ट आहे की, चीन आपल्या भूभागात घुसलेला आहे. ही गोष्ट मला अस्वस्थ करते. खरं सांगायचं तर माझं रक्त उसळतं. दुसरा देश माझ्या देशाच्या भूभागात येऊ कसा शकतो? आता एक राजकीय नेते म्हणून तुम्हाला वाटत की, मी गप्प रहावं आणि माझ्या लोकांशी खोटं बोलावं. जेव्हा की सत्य मला कळालं आहे. मी सॅटेलाईट फोटो बघितले आहेत. निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांशी बोललो आहे आणि तुम्हाला वाटत की मी खोटं बोलावं,” असं राहुल गांधी यांनी मोदी सरकारला उद्देशून म्हटलं आहे.

“चीननं माझ्या देशात घुसखोरी केलेली नाही, असं मी खोटं बोलणार नाही. माझं पूर्ण करिअर बुडालं तरी चालेल, पण मी स्पष्ट करू इच्छितो की मी खोटं बोलणार नाही. मला वाटत चीननं घुसखोरी केली नाही, असं काही लोक खोटं बोलत आहेत. मला वाटत हेच लोक राष्ट्रवादी नाहीत. माझ्या मते जे लोक खोटं बोलत आहेत आणि सांगत आहेत की चीननं घुसखोरी केलेली नाही, ते लोकच देशभक्त नाहीत. मला याची राजकीय किंमत मोजावी लागली तरी चालेल, माझं राजकीय करिअर संपल, तरी काळजी नाही. पण, जिथपर्यंत भारतीय भूभागाचा प्रश्न आहे, मी केवळ सत्य बोलेल,” असं राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी पुन्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी?

‘भाजपचा भ्रम लवकरच तुटेल,देशाला याची मोठी किंमत मोजावी लागेल’

चीनच्या पंतप्रधानांना मोदी 19 वेळा भेटले, पण यातून काही निष्पन्न झाले का?

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!