Share

हातातोंडाशी आलेला घास वादळी पावसाने हिरावला; आजही पावसाचा इशारा

Published On: 

नांदेड: मागील दोन दिवसापासून सुरु असलेल्या वादळी पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्याचे नुकसान झाले आहेत. हातातोंडाशी आलेला रब्बी पीकांचा घास हिरावला गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अवकाळी पावसाचा फटका सर्वाधिक हरभरा पिकांना बसला आहे.

बुधवारी रात्रीपासून अर्धापुर तालुक्यात विजेच्या कडकडाटासह पावसाने अचानक हजेरी लावली.  या पावसात टरबूज, हरभरा पिकांचे नुकसान झाले. त्यात गुरुवारी पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने शेतकऱ्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आसुन हरभऱ्याची काढणी काढायला घेतले आहे. हळद उत्पादक शेतकऱ्यांनीही हळद काढणी सुरु केली आहे. सध्याही परिसरात ढगाळ वातावरण असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

तर नायगाव तालुक्यातील कुंटूर परिसरात झालेल्या जोरदार पावसाने हरभरा, गहू, ज्वारीचे आतोनात नुकसान झाले. येथील शेतकऱ्यांनी वाळण्यासाठी टाकलेला होता, त्यात पाऊस पडल्याने नुकसान झाले आहे. माहूर तालुक्यात गारपीट झाल्याने कापून ठेवलेल्या हरभरा पिकाचे नुकसान झाले आहे. बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी कपाशी उपटून हरभरा पीक घेतले. मात्र पावसामुळे तेही वाया जाण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने शुक्रवारी वादळी पावसाचा आंदाज वर्तवल्याने शेतकऱ्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!