मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. दोन दिवसांच्या अधिवेशनात देखील अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळत असून काही काळ सभागृहाचे कामकाज देखील तहकूब करण्यात आले होते. तर, या गोंधळानंतर असंसदीय शब्द वापरत धक्काबुक्की केल्याचा आरोप करत तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी १२ आमदारांच्या निलंबनाला मान्यता दिली.
या कारवाईच्या निषेधार्थ भाजपने कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला. तर, भाजपच्या सर्वच नेत्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. तर, भाजप आमदारांच वर्तन हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळिमा असल्याची टीका महाविकास आघाडीतील नेते करत आहेत.
दरम्यान, या वादावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी ट्विट करून भाजपवर बोचरी टीका केली आहे. ‘त्यांच्या ओरडण्यामागे सत्तेचा हापापलेपणा आहे, चर्चेपासून पळ काढत गोंधळघालणे हाच त्यांचा अजेंडा आहे,’ असं रोहिणी खडसे म्हणाल्या आहेत.
त्यांच्या ओरडण्यामागे
सत्तेचा हापापलेपणा आहे,
चर्चेपासून पळ काढत गोंधळ
घालणे हाच त्यांचा अजेंडा आहे ।#MansoonSession— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) July 5, 2021
भाजपच्या डझनभर आमदारांचे निलंबन
याच पार्श्वभूमीवर संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी भाजपच्या १२ आमदारांवर कारवाई म्हणून १ वर्षासाठी निलंबित करण्याचा ठराव मांडला होता. हा ठराव आवाजी मतदानाने सभागृहात मंजूर करण्यात आला आहे. या निलंबनानंतर भाजप नेते कामकाजावर बहिष्कार टाकत सभागृहातून बाहेर आले. गिरीश महाजन, आशिष शेलार, योगेश सागर, अभिमन्यू पवार, संजय कुटे, अतुल भातखळकर, पराग अळवणी, राम सातपुते, हरीश पिंपळे, नारायण कुचे, जयकुमार रावत, किर्तीकुमार बागडीया या आमदारांचा समावेश आहे. या आमदारांना पुढील एक वर्षासाठी विधानसभेच्या मुंबई किंवा नागपूरच्या एकाही कामकाज सहभाग घेता येणार नाही.
नेमका गोंधळ काय ?
ओबीसी आरक्षणासाठीच्या इम्पिरीकल डाटा केंद्राकडून मिळावा यासंदर्भात एक प्रस्ताव आज मंत्री छगन भुजबळ यांनी मांडल्यानंतर तो सभागृहात मंजूर करण्यात आला. मात्र, हा ठराव मांडण्यात आल्यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या दालनात येऊन जोरदार घोषणाबाजी केली. तसेच अध्यक्षांचा माईकही ओढला. यावेळी धक्काबुक्की देखील झाली. तर, तालिका अध्यक्षांना शिवीगाळ केल्याचा आरोप देखील ठेवण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- वरुणराजाच्या आगमनासाठी सत्ताधारी शिवसेनेचे महादेवाला साकडे
- वारीसह गणेश उत्सव, बकरी ईदच्या परवानगीसाठी खा. इम्तियाज जलील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- ‘अध्यक्षांच्या चेंबरमध्ये शिवीगाळ कोणी केली हे जाणून घेण्यासाठी भास्कर जाधव यांची नार्को टेस्ट करा’
- समाजासाठी गट-तट न पाडता एकत्र येत लढा उभारावा, मराठा क्रांती मोर्चाच्या मंथन परिषदेत आवाहन!
- भाजप आमदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ आता नाशिकमध्ये लोकशाही वाचवा दिन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

