Share

द ग्रेट खलीचा राजकारणात प्रवेश

Published On: 

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने देशातील ५ राज्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केल्या नंतर देशभरात सध्या राजकीय वातावरणात मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आहे. उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मणिपूर,गोवा आणि पंजाब या पाच राज्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात विधानसभा निवडणूका होणार आहेत. तर त्यांचा निकाल १० मार्च रोजी लागणार आहे. त्यातच आज आलेल्या ताज्या बातमीनुसार डब्ल्यूडब्ल्यूई (WWE) मधील प्रसिद्ध भारतीय पैलवान/रेसलर द ग्रेट खली याने राजकारणात प्रवेश केला आहे.

भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वरूपात भारत देशाला एक उत्तम प्रशासक, प्रधानमंत्री मिळाला आहे असे कौतुक करून त्याने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. द ग्रेट खली च खरं नाव दिलीप सिंह राणा असून तो मूळचा हिमाचल प्रदेश राज्याचा रहिवासी आहे. द खली आधी पंजाब पोलीस दलात कार्यरत होता त्यानंतर त्याने अमेरिकेत खेळवलया जाणाऱ्या प्रसिद्ध WWE स्पर्धेत आपले नाव गाजवले.

मूळचा हिमाचल प्रदेश या राज्याचा रहिवासी असणारा द ग्रेट खली पंजाब मधील जालंधर राज्यात ”कॉन्टिनेंटल रेसलिंग एनटरटेन्मेन्ट” (CWE) या नावाने कुस्ती अकादमी चालवतो. जिथे तो तरुणांना कुस्तीचे डावपेच शिकवतो. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि भाजप खासदार सुनीता दुग्गल यांनी त्यांच्या उपस्थित त्याने पक्षात प्रवेश केला. खली लवकरच पंजाबमध्ये भाजपचा प्रचार करताना दिसणार आहे. भारतीय जनता पक्षात प्रवेश करताना द ग्रेट खली म्हणाला कि,” WWE मध्ये खेळताना भरपूर पैसा होता आणि नाव पण होत होते परंतु मी भारत देशाच्या प्रेमापोटी मी अमेरिकेहून परत परतलो आहे, भारतीय जनता पक्ष आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशाला योग्य दिशेने पुढे नेत आहेत म्हणून मी देशाची सेवा करण्यासाठी राजकारणात प्रवेश करत आहे.” द ग्रेट खली हा पंजाब राज्यातील निवणुकीसाठी प्रचार करणार आहे.

   महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!