मुंबई : मागील काही दिवसात मुस्लिम विद्यार्थिनींना शाळेत आणि महाविद्यालयात हिजाब घालून येण्यावर बंदी घातली होती. त्याविरोधात न्यायालयात विद्यार्थिनींनी दाद मागितली आहे. परंतु काही ठिकाणी त्यांना विरोध करण्यासाठी हिंदू विद्यार्थी शाळा आणि महाविद्यालायच्या आवारात भगवी शाल (शेला) घालून पहायला मिळत आहेत. त्यामुळे आता येथील वातावरण चांगलेच चिघळत असल्याचे दिसत आहे. तसेच कर्नाटक येथील हिजाब प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रातही बघायला मिळत असतांना मुंबईतील एका कॉलेजमध्ये हिजाब घालण्यावर बंदी असल्याचे समोर आले आहे.
मुंबईतील एसएनडीटी विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या माटुंगा येथील एमएमपी शाह कॉलेजमध्ये हिजाब घालून कॉलेजमध्ये प्रवेश करणाऱ्यांना बंदी असून महाविद्यालयाच्या नियमावली पुस्तिकेत याविषयी लिहिण्यात आले आहे. तसेच यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना एमएमपी शाह कॉलेजचे मुख्याध्यापक म्हणाले की,‘आमच्या महाविद्यालयाच्या पत्रिकेत ते आहे की नाही याबद्दल काहीही प्रतिक्रिया मी देणार नाही.’

दरम्यान, कर्नाटक येथील हिजाब प्रकरणाचे पडसाद आता महाराष्ट्रातही बघायला मिळत असून महाराष्ट्रात काही ठिकाणी हिजाबच्या समर्थनार्थ मुस्लीम संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. मुंबईत मुस्लीम महिला (Muslim Women) रस्त्यावर उतरल्या असून मुस्लीम संघटनांकडून सह्यांचं कॅम्पेन (signature campaign) राबवले जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना पत्र लिहीत मंगेशकर कुटुंबियांनी व्यक्त केली नाराजी
गडकरींच्या घराबाहेर काँग्रेस भाजप आमने-सामने; पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात
‘पाचही राज्यात भाजपची नव्हे, असंतोषाची लाट’; विजय वडेट्टीवार यांची टीका
“कॉंग्रेस मुक्त भारत सोडा, अगोदर कॉंग्रेस मुक्त भाषण करून दाखवा”, यशोमती ठाकूर यांचे मोदींना आव्हान


