Share

शासनाची घरकुल योजना गरीबांसाठी आहे दारुवाल्यांसाठी नाही – दत्ता गोर्डे

Published On: 

औरंगाबाद : शासनाने सर्वासाठी घरे या योजने अंतर्गत गरीबांसाठी घरे हि योजना सुरु केलेली आहे, स्थानिक पुढारी मात्र शासकीय आधिका-यावर दबाव आणुन हि योजना दारुच्या दुकानदारांसाठी राबवत आहे हे खपवुन घेतले जाणार नाही, असे प्रतिपादन राकॉंचे नेते दत्ता गोर्डे यांनी केले.

ते राष्ट्रवादी कॉंग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजीत धरणे आंदोलनात बोलत होते, यावेळी बोलतांना गोर्डे पुढे म्हणाले की गोरगरीब लोक चाळीस चाळीस वर्षापासुन शासकीय जमीनीवर वासतव्य करीत आहे, केवळ पीआर कार्ड नसल्याने त्यांना घरकुलाचा लाभ मिळत नव्हता, म्हणुन शासनाने शासकीय जमीनी गरीबांच्या नावावर करण्याचा जीआर काढला, माञ् यांनी आधिका-यांवर दबाव आणुन शासकीय जागेवर असलेल्या दारु दुकाना नावावर करण्याचा डाव रचला, मात्र त्यांचा हा डाव आम्ही तडीस जाऊ देणार नाही, शेवट पर्यंत गरीबांसाठी लढुन त्यांना त्यांना त्यांच्या हक्काच्या घरकुलाचा लाभ मिळवून देणारच अशी ग्वाही या प्रसंगी बोलतांना गोर्डे यांनी दिली.

या धरणे आंदोलना प्रसंगी राकॉंचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब निर्मळ, तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष विनोद तांबे, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष माऊली मुळे, युवकचे भाऊसाहेब तरमळे आंदीची भाषने झाली यावेळी कॉंग्रेसचे शहरअध्यक्ष निमेश पटेल, माजी नगरअध्यक्ष अनिल घोडके, नगरसेवक इरफान बागवान, अफरोज वड्डे, रतन गारदे, प्रविण शिंदे, अप्पासाहेब गायकवाड, भाऊसाहेब पिसे, भिकाजी आठवले, फाजल टेकडी, रावसाहेब आडसुल, रावसाहेब नाडे, गणेश पवार आदींची प्रमुख उपस्थीती होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!