Share

सरकार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे टपाल तिकिट प्रकाशित करणार

Published On: 

मुंबई : आपल्या साहित्यातून सामान्य माणसांच्या दु:खाला वाचा फोडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी शासन साजरी करत आहे. या निमित्ताने 1 ऑगस्ट २०१९ रोजी त्यांचे टपाल तिकिट प्रकाशित करणार असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. आज मुनगंटीवार यांनी विशेष सहाय्य योजनांचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधानसचिव दिनेश वाघमारे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाप्रित्यर्थ राज्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यासाठी अर्थसंकल्पात १०० कोटी रुपयांचा निधी राखून ठेवला असल्याची माहिती देऊन मुनगंटीवार म्हणाले की, विशेष सहाय्य अंतर्गत येणाऱ्या केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांमधील लाभार्थ्यांना दर दोन महिन्यांनी नियमित अनुदान मिळेल अशी व्यवस्था विभागाने तत्काळ निर्माण करावी, अनुदानापासून गरीब जनतेस, निराधार जनतेस वंचित ठेऊ नये.

विशेष सहाय्य योजनांचे लाभार्थी, त्यांची नावे आणि याद्या या सगळ्या बाबी संगणकीकृत कराव्यात अशा सूचनाही मंत्रीमहोदयांनी यावेळी दिल्या. लाभार्थ्यांचे बँक खाते आधारलिंक केल्यास डुप्लीकेशन टाळता येईल, त्यामुळे सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांची खाती आधारलिंक करण्यास गती द्यावी असेही ते म्हणाले. विशेष सहाय्य योजनांच्या काही लाभार्थ्यांचे खाते हे हंडियन पोस्टल पेमेंट बँकेत आहे. त्यांचीही एकदा बैठक आयोजित करण्यात यावी अशा सूचनाही मुनगंटीवार यांनी दिल्या.

योजनांचे लाभ देतांना जिल्हाधिकारी आणि मंत्रालय यामधली यंत्रणा म्हणून प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट निर्माण केल्यास विशेष सहाय्य योजनांचे लाभ लाभार्थ्यांना सुरळितपणे देणे शक्य होईल. यासंबंधीचा प्रस्ताव लवकरच राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी सादर करणार असल्याचे वाघमारे यांनी यावेळी सांगितले. महाडीबीटी पोर्टलवरून विशेष सहाय्य योजनांच्या लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्याबाबत विभाग काम करत असल्याचेही बैठकीत सांगण्यात आले.

विभागाच्यावतीने आज मुनगंटीवार यांच्यासमोर संजय गाधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना या योजनांचे सादरीकरण करण्यात आले. योजनांची माहिती, लाभार्थ्यांची संख्या आणि अनुदानाचे स्वरूप यावर त्यात माहिती होती.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!