Share

सरकारने कोणाचेही मुडदे पाडायचे, विरोधकांनी आवाज उठवला की, त्यांचे गळे आवळायचे- राऊत

Published On: 

मुंबई : लखीमपूरमधील हिंसाचाराच्या घटनेनंतर देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी उत्तर प्रदेशातील योगी सरकारवर तसेच केंद्रावर टीकास्त्रांचा प्रहार करण्यास सुरुवात केली आहे. या हिंसाचार प्रकरणी शेतकऱ्यांना भेटायला जात असणाऱ्या काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत मंगळवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली आणि बुधवारी सामनामधून राऊतांनी आपली भूमिका मांडत पुन्हा एकदा भाजपवर शरसंधाण साधलं आहे. प्रियांका गांधींबाबत राऊतांनी आपली भूमिका मांडली आहे.

चिरडून मारलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबास त्यांना भेटायचे होते. प्रशासनाने प्रियंका यांना नुसतेच रोखले नाही, तर त्या मुलीस धक्काबुकी करून गाडीत कोंबले. प्रियंका गांधी या झुंजार आणि लढाऊ आहेत. त्या गप्प बसल्या नाहीत. त्यांच्या डोळय़ांत आणि आवाजात इंदिरा गांधींची धार आहे. सीतापूरच्या तुरुंगातूनही त्यांनी संघर्ष सुरूच ठेवला आहे. उत्तर प्रदेशातील शेतकरी हत्याकांडाचे पडसाद जगभर उमटले आहेत. सरकारने कोणाचेही, कसेही मुडदे पाडायचे व विरोधकांनी त्यावर आवाज उठवला तर त्यांचे गळे आवळायचे. ज्यांना मारले त्यांच्या नातेवाईकांनी अश्रू ढाळले, हुंदके दिले, तर त्या नातेवाईकांवरही उद्या सरकार उलथविण्याचे कट रचले म्हणून खटले दाखल केले जातील, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

ज्यांना मारले त्यांच्या नातेवाईकांनी अश्रू ढाळले, हुंदके दिले, तर त्या नातेवाईकांवरही उद्या सरकार उलथविण्याचे कट रचले म्हणून खटले दाखल केले जातील. लखीमपूर खेरीत केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांचे हत्याकांड घडवले. त्या मंत्रीपुत्रास वाचवण्याचे प्रयत्न योगींच्या पोलिसांनी केले. ”तो मी नव्हेच, मी तेथे नव्हतोच,” असा आव मंत्रीपुत्राने आणला. पण आता शेतकऱ्यांवर घुसवलेल्या गाडीचा व्हिडीओच समोर आला. त्यामुळे सरकार काय करणार?, असा सवाल केंद्र सरकारला राऊतांनी विचारला आहे.

प. बंगाल, महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगढ, केरळात घडले असते तर त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने देशभर आंदोलन पुकारले असते. प्रियंका गांधींना ज्याप्रमाणे अपमानित करून धक्के मारले हे भाजपच्या महिला कार्यकर्त्यांच्या बाबतीत घडले असते तर महाराष्ट्रातील भाजपची महिला फौज फुगडय़ा घालत रस्त्यावर उतरली असती. महिलांवरील अत्याचाराची स्वतंत्र व्याख्या भाजपने केली असून त्या व्याख्येत इंदिरा गांधींच्या नातीवर झालेला हल्ला बसत नाही, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

लखीमपूर खेरीत जाण्यापासून छत्तीसगढ, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनाही योगी सरकारने रोखले आहे. हे काय हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध सुरू आहे काय? आपल्याच देशातील दोन मुख्यमंत्र्यांना लखनौत उतरण्यापासून रोखले जाते. हा संघराज्यातील एक विचित्र प्रकार घडला आहे. लोकशाहीचा असा गळा आणीबाणीच्या काळातही कधी घोटला नव्हता, असं संजय राऊत सामनामध्ये म्हणाले आहेत.

लखीमपूरची लढाई राजकीय नसून जगभरातील शेतकरी, कष्टकऱ्यांच्या हक्काची बनली आहे. ब्रिटिश काळात लाला लजपतराय हे शेतकऱ्यांचे नेते ब्रिटिश जुलुमाविरुद्ध रस्त्यावर उतरले. त्यांच्यावर निर्घृण हल्ला ब्रिटिशांनी केला. त्यातच लालाजींचा मृत्यू झाला. जालियनवाला बागेत शेतकऱ्यांवर गोळय़ा चालवणारा जनरल डायर ब्रिटिश होता. मुंबईत परदेशी कापडाविरोधात आंदोलन करणाऱ्या बाबू गेनूच्या अंगावरून ट्रक नेणाराही ब्रिटिश होता. पण लखीमपुरात हक्कासाठी आवाज उठवणाऱ्या शेतकऱ्यांवर भरधाव गाडी घालणारा स्वतंत्र हिंदुस्थानातील केंद्रीय मंत्र्याचा पुत्र आहे, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!