नवी दिल्ली:- दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा आज 19वा दिवस आहे. आता लवकरच या आंदोलनावर तोडगा निघू शकतो, अशी शक्यता वर्तवली आज आहे. मात्र, 18 दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनाने आता आक्रमक स्वरूप धारण केले आहे. नव्या जाचक कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन तीव्र आणि देशव्यापी करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला असून रविवारी सकाळी ‘चलो दिल्ली’ आंदोलन, तर सोमवारी प्रमुख शेतकरी नेते उपोषण करणार आहेत. आम्ही सरकारशी चर्चेस तयार आहोत; मात्र आधी तिन्ही नवे कृषी कायदे रद्द करण्याबाबत चर्चा होईल, असे शेतकऱ्यांच्या नेत्यांनी सांगितले आहे.
आता दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी दिल्लीत पोहोचले आहेत. शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेले हे काळे कायदे सरकारने मागे घेतल्याशिवाय आम्ही हटणार नाही. तसेच चर्चेच्या फेऱ्या आता बंद करा, आता निर्णय घ्या, अशी भूमिका यावेळी राजू शेट्टी यांनी मांडली आहे.
लोकशाही आणि शांततेच्या मार्गाने शेतकरी आंदोलन करत आहेत. आंदोलन कसं करायचं हे शेतकऱ्यांकडून शिकण्यासारखं आहे. तसेच जो नियम उसाला तोच नियम बाकी पीकांना असायला हवा, अशी तरतूद करणारा कायदा करा. मी स्वत: यासंबंधीचं खाजगी विधेयक 2018 साली खासदार असताना मांडलं होतं. त्या विधेयकाला अनेक खासदारांनी पाठिंबा दिला होता. तेच विधेयक सरकारी विधेयक म्हणून मांडावं, अशी मागणी राजू शेट्टी यांनी यावेळी केली.
महत्वाच्या बातम्या
- खोटी GST बिले सादर करून फसवे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवणाऱ्या लेखापरिक्षकाला अटक
- ‘मी कंगाल आहे माझी सगळी संपत्ती ‘या’ व्यक्तीने लुबाडली’, राखी सावंतचा खळबळजनक दावा
- देशातील बँकांचे कोट्यवधी रुपये बुडवणाऱ्या मल्ल्याची आर्थिक नाकेबंदी
- महाराष्ट्रात लोकशाही संपली असून उद्धव ठाकरेंची हुकूमशाही सुरू आहे; भाजपची टीका
- भारतात कोविडग्रस्तांची संख्या 3.6 लाखांहून खाली आली?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

