Share

काळजी करू नका महाशिवआघाडीचे सरकार लवकरच बसणार – उद्धव ठाकरे

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. यादरम्यान कडेगाव तालुक्यातील आंबेगाव येथे एका टोमॅटो पिकाची नुकसानी पाहण्यासाठी ठाकरे जात होते. यावेळी ग्रामपंचायत नेवरी येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम आणि आमदार आणि कार्याध्यक्ष विश्वजीत कदम यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

सरकार म्हणून जी आवश्यक ती सर्व मदत करता येईल ती लवकरच नक्की करू असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विट्यातील अवकाळी ग्रस्त शेती पिकांच्या पाहणी दौऱ्यात दिले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज विटा आणि आंबेगाव ता.कडेगाव येथील द्राक्ष, डाळींब, कलिंगड आणि टोमॅटो पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.

यावेळी ठाकरे म्हणाले, राज्यात महाशिव आघाडीचे लवकरच सरकार बसणार आहे. त्यामुळे काळजी करू नका. आपण संपूर्ण कर्जमाफी तर देणार आहोतच. पण सध्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत प्रत्येक शेतकऱ्याला मदत देण्याची आमची भूमिका आहे. शेती आणि शेतकरी हा आमच्या सरकारचा केंद्रबिंदू राहिल.

यावेळी ठाकरे यांच्यासोबत खा. विनायक राऊत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम, आमदार विश्वजीत कदम, आमदार अनिलराव बाबर, संपर्कप्रमुख नितिन बानुगडे पाटील, पक्षनेते नीलम गोरे, माजी मंत्री विजय शिवतारे, जिल्हा प्रमुख संजय विभुते बजरंग पाटील आदी उपस्थित होते.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज विट्यातील श्रीराम उत्तम लोटके डाळिंब बाग आणि प्रकाश गायकवाड यांच्या द्राक्ष पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी ठाकरे यांना आमदार अनिल राव बाबर यांनी पीक विम्याचे संरक्षण देताना विमा कंपन्यांनी विम्याची मुदत बदलली पाहिजे अशी विधिमंडळात केलेल्या मागणीची आठवण करून देत अद्याप त्यावर कार्यवाही झालेली नसल्याचे निदर्शनास आणले.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1195313893272215554?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1195313708353736704?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1195313392535232513?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!