टीम महाराष्ट्र देशा : राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नागपुरात पोहचले आहेत. उद्यापासून (ता. १६) सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज नागपुरात आघाडीच्या नेत्यांशी संवाद साधला.
यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ”माझ्याकडे जनतेचे आशिर्वाद आहेत. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण हा संपूर्ण महाराष्ट्र एक आहे. महाराष्ट्राला अभिमान वाटावा असे सरकार, प्रशासन आम्ही चालवू. जर आपण एकत्र आलो तर हे सरकार केवळ पाच वर्षेच नव्हे तर २५ वर्षेच काय ५० वर्षे आणि पिढ्यान पिढ्या कायम राहिलं, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले, ‘ माझा आजवरचा अनुभव पणाला लावून माझ्या गोरगरीब जनतेला समाधान देण्याचा मी प्रयत्न करेन. मुख्यमंत्री म्हणून आता माझी कारकीर्द खऱ्या अर्थाने सुरु होत आहे, त्यामुळे तुमचे आशिर्वाद असेच कायम राहू द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी जनतेला केले.
महत्त्वाच्या बातम्या :
https://twitter.com/Maha_Desha/status/1206154748849573888?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1206167029088047110?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

