Share

बँक ग्राहकांसाठी खुशखबर आता चेक क्लीअर होण्यासाठी लागणार नाही वेळ

Published On: 

नवी दिल्ली: बँक ग्राहकांना चेकने व्यवहार करताना अनेकदा चेक क्लीअर होण्याच्या कामाला लागणाऱ्या वेळेमुळे अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सोमवारी देशातील सर्व बँकांमध्ये चेक ट्रंकेशन सिस्टम लागू करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे ग्राहकांचा वेळ आणि पैसा दोन्ही ही वाचणार आहे.

चेक ट्रंकेशन सिस्टम म्हणजे पूर्वी धनादेश एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी पाठविला जात असे. चेक ट्रंकेशन सिस्टम अंतर्गत इलेक्ट्रॉनिक फोटोद्वारे ते पैसे देणाऱ्याच्या शाखेत पाठविले जाते. ज्यामध्ये एमआयसीआर बँडचा डेटा, सादरीकरणाची तारीख, बँकेचा तपशील यांसारख्या संबंधित माहितीचा समावेश आहे.

आतापर्यंत सीटीएस फक्त काही बँकांच्या निवडक शाखांमध्येच लागू होती. आरबीआयने जारी केलेल्या अधिसूचनेत सर्व बँकांना 30 सप्टेंबर 2021 पर्यंत याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आलेत. सध्या जवळपास 18 हजार शाखांमध्ये ही सुविधा नाही. आरबीआय धनादेशांच्या माध्यमातून व्यवहार सुरक्षित आणि वेगवान बनविण्यासाठी नवीन पद्धती अवलंबत आहे. यात चेक ट्रंकेशन सिस्टम देखील स्वीकारण्यात आलेय. नवीन वर्षापासून धनादेशासह पैसे देण्याचे नियम बदललेत.

यावर्षी पासून सीटीएस सराव होता आणि सध्या सुमारे दीड लाख शाखांमध्ये ती व्यवस्था कार्यरत आहे. त्याचबरोबर नॉन सीटीएस क्लिअरिंग हाऊसेससुद्धा सप्टेंबरपासून सीटीएसमध्ये स्थलांतरित झालीत. ज्या बँकेच्या शाखांमध्ये आतापर्यंत सीटीएस नाही, तिथे ग्राहकांना जास्त वेळ दिल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याच वेळी केंद्रीय बँकेने असे म्हटले आहे की, 30 एप्रिल 2021 पूर्वी सीटीएसला सर्व बँकांपर्यंत पोहोचवण्यासाठी रोडमॅप सादर करावा लागेल.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!