पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचा लोकार्पण सोहळा पार पडला आहे. पुण्यासोबत पिंपरी-चिंचवडच्या मेट्रोचेही आज मोदी यांच्या हस्ते उदघाटन झाले. उद्घाटनांतर पुणेकरांना मेट्रोने प्रवास करता येणार आहे. सहा मार्चला दुपारी तीन ते रात्री नऊ या वेळेत पुणे आणि पिंपरीतील दोन्ही मार्गिकांवर मेट्रोची सेवा नागरिकांसाठी खुली करण्यात येणार आहे. तसेच सोमवारपासून पुणेकरांना दररोज सकाळी आठ ते रात्री नऊदरम्यान मेट्रोतून प्रवास करता येणार आहे. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे पिंपरी ते फुगेवाडी येथील मेट्रोच्या दोन कोचच्या काचांना तडे गेल्याचे समोर आले आहे.
ही बाब मेट्रोच्या अधिकाऱ्यांच्या लक्ष्यात आल्यानंतर सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पण नंतर त्यांनी हा देखभालीचा भाग असल्याचे सांगितले. त्यामुळे आता मेट्रो सुरू करण्यास एवढी घाई करण्यात आली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. उद्घाटनाच्या दिवशीच मेट्रोच्या डब्याच्या काचांना तडे गेल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. या काचांच्या दुरुस्ती संदर्भात विचारले असता अधिकारी म्हणाले कि, “मेट्रोच्या देखभालीसाठीच्या सर्व पायाभूत सुविधा आमच्याकडे तयार आहेत. मेट्रोची नियमित देखभाल होणार आहे. काचांना तडे का व कसे गेले हे तपासण्यात येईल.”
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

