🕒 1 min read
मुंबई : ‘पवारांवर धाडी पडणार आहेत हे भाजपचे नेते आधीच जाहीर करतात तेव्हा यंत्रणांचा फोलपणा लक्षात येतो. भ्रष्टाचाराच्या खोटय़ा प्रकरणांचा देखावा उभा करून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा खेळ चालला आहे’, असे म्हणत सामनातील रोखठोकच्या माध्यमातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
रोखठोकमध्ये राऊत म्हणाले आहेत की,’उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांवर आयकर विभागाने धाडी घातल्या व त्याचा मोठा गाजावाजा भाजपने केला. अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्या राजकारणात नसलेल्या दोन बहिणींच्या घरात आयकर विभागाचे अधिकारी घुसले. पवार यांच्या जवळच्या मित्रांवर धाडी पडल्या व चार-पाच दिवस हे धाडसत्र सुरूच राहिले. अजित पवारांच्या दोन्ही बहिणी राजकारणात नाहीत, पण पवारांचे नातेवाईक म्हणून त्यांच्या घरात केंद्रीय तपास यंत्रणांचे लोक घुसले. घराचा ताबाच त्यांनी घेतला. जणू हे सर्व लोक गुन्हेगार आहेत अशा थाटात ते घुसले. एखाद्या सुसंस्कृत कुटुंबाच्या घरात ते शिरतात तेव्हा चांगल्या अधिकाऱयांवर दडपण येते व आपल्याकडून चूक होते असे त्यांच्या मनास वाटते, तेव्हा ते खजील होतात.
दरम्यान, ‘आम्ही काय करणार? हे सर्व वरून आले आहे,’ असे वर बोट करून ते त्यांचे कर्तव्य बजावतात. पुन्हा पवारांवर धाडी पडणार आहेत हे भाजपचे नेते आधीच जाहीर करतात तेव्हा यंत्रणांचा फोलपणा लक्षात येतो. भ्रष्टाचाराच्या खोटय़ा प्रकरणांचा देखावा उभा करून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा खेळ चालला आहे. अशा धाडी घालून त्रास द्यायचा व कोणाला तरी झुकवायचे हेच त्यामागचे धोरण आहे, पण महाराष्ट्र झुकणार नाही असे ठाकऱयांपासून पवारांपर्यंत सगळय़ांनीच जाहीर केले आहे. जो महाराष्ट्र दिल्लीतल्या औरंगजेबापुढे झुकला नाही व मोगलाईविरुद्ध लढत राहिला तो आज कोणापुढे झुकेल, हा प्रश्नच निर्माण होत नाही’, असेही राऊत म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- आगामी महापालिका निवडणूकांसंदर्भात गडकरी आणि फडणवीस यांच्यात चर्चा
- ३७० कलम रद्द करुनही काश्मीरप्रश्न सुटलेला नाही- मोहन भागवत
- ‘कारवाई करणार असेल तरच यावं अन्यथा…’; उदयनराजेंचे ईडीला पुन्हा एकदा आव्हान
- कुणी ‘शेण खा’ म्हटलं तर तू खातोस का? शिवसेना आमदारांचा राष्ट्रवादीच्या आमदाराला खोचक सवाल
- मोदींची घोषणा! अयोध्येच्या तीर्थयात्रेसाठी भाजप सरकार ५० हजारांची आर्थिक मदत करणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
