Share

पुराचे खापर अधिकाऱ्यांवर फोडून मोकळे झालात, पण या तमाशावर लोक विश्वास ठेवतील का?

Published On: 

मुंबई: चिपळूण येथे मुख्यमंत्र्यांसमोर आमदार भास्कर जाधव यांची महिलेवरील दमदाटीमुळे त्यांच्यावर भाजपकडून सडकून टीका करण्यात आली. त्यांनतर भास्कर जाधव यांनी पुन्हा चिपळूण गाठत बाजारपेठेतील नागरिकांच्या मदतीसाठी तेथे पोहचले. या ठिकाणी त्यांनी परिषदही घेतली. या परिषदेत त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर घेतले. पूरग्रस्त परिस्थितीचे खापर अधिकाऱ्यांवर फोडल्याने भाजप प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी भास्कर जाधव यांच्यावर निशाना साधला आहे.

शिवसेना आ.भास्कर जाधव यांनी पुराचे खापर फोडायला डोकी शोधली. लोकांचा संताप खड्ड्यात घालणार हे लक्षात आल्यावर पुरामुळे झालेल्या नुकसानीचा ठपका प्रशासकीय अधिकाऱ्यावर फोडून ते मोकळे झाले आहेत. जबाबदारीतून ठाकरे सरकारची कशी अलगद सुटका करत आहेत ते बघा, पण लोक विश्वास ठेवतील का या तमाशा वर? असा सवाल करत त्यांनी भास्कर जाधव यांचा व्हीडीओ समाज माध्यमावर शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये भास्कर जाधव चांगलेच संतापले असल्याचे दिसून येत आहे. यात पाहणी दरम्यान एकही अधिकारी उपस्थित नसल्यामुळे भास्कर जाधव यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे. तसेच या संकटावेळी अधिकारी कोठे होते असा सवाल करत त्यांच्यावर कारवाई करण्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्या या व्हिडीओवर भाजपकडून आता सडकून टीका केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!