चंद्रपूर : पूर्व विदर्भातील पुराचे संकट अतिशय गंभीर असून, अस्मानी संकटापेक्षा ते मानवनिर्मीत जास्त आहे. यात शासनाचा, शासनाच्या अधिकार्यांचा दोष आहे. जर गोसीखुर्दचे पाणी सोडायचे होते, तर नागरिकांना पूर्व सूचना द्यायला पाहिजे होती. तसे केले असते, तर ही पुरस्थिती इतक्या भीषण स्वरूपात पुढे आली नसती, असा गंभीर आरोप राज्याचे माजी अर्थमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. शासनाने पुरग्रस्तांची थट्टा करू नये व आमच्यावर आंदोलनाची पाळी आणू नये, असा इशाराही त्यांनी दिला.
गावांमध्ये पाणी शिरले, गावे पाण्याने वेढली गेली, घरांचे, शेतीचे अतोनात नुकसान झाले, कागदपत्रे वाहून गेलीत, शेतीचे शंभर टक्के नुकसान झाले, एकाही विहिरीत किंवा बोअरींगमध्ये शुध्द पाणी राहिलेले नाही. अशा बिकट परिस्थितीत नागरिकांना तातडीची मदत मिळण्याची नितांत आवश्यकता आहे.
पत्रकारांना द्या ५० लाखाचे विमा कवच, ‘या’ जिल्ह्यात होतेय मागणी
भाजपा सरकारच्या काळात कोल्हापूर, सांगली भागात उद्भवलेल्या पुरादरम्यान 29 ऑगस्ट 2019 रोजी मदतीसंबंधीचा जो शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता, तो या आपद परिस्थीतीत तसाच लागू करावा, त्यातील मदतीच्या रकमेत वाढ करावी. तातडीने पूरग्रस्तांना 10 हजारांची मदत करावी, 10 किलो तांदूळ, 10 किलो गहू, केरोसीन पुढील तीन महिन्यांपर्यंत पुरग्रस्तांना पुरवावे, अशी मागणीही त्यांनी केली.
मुळा धरण परिसरात कलम १४४ लागू!
गुरूवार, 2 सप्टेंबर रोजी आ. मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्हयातील ब्रम्हपूरी तालुक्यातील बेलगांव, बेटाळा आणि पारडगांव आदी गावांना भेटी देत, पुरपरिस्थीतीची पाहणी केली. यावेळी त्यांनी पुरग्रस्तांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. यावेळी खा. अशोक नेते, आ. किर्तीकुमार भांगडीया, माजी आमदार प्रा. अतुल देशकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरनुले, जिल्हा भाजपाचे अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा परिषद सदस्य संजय गजपुरे यांच्यासह भाजपा पदाधिकार्यांची उपस्थिती होती.
निवडणूक आली की आठवतो शिक्षक, कोरोना झाला की आठवतो शिक्षक…तुम्हीच सांगा साहेब आम्ही कोणते काम करायचे?
आ. मुनगंटीवार यावेळी म्हणाले, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा हे आदिवासीबहुल जिल्हे आहेत. मानव विकास निर्देशांकात असलेल्या या जिल्हयांमध्ये आलेल्या या पुरपरिस्थीतीत हातावर पोट घेऊन जगणार्या नागरिकांना, शेतकर्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे तातडीने त्यांना मदत करीत, 29 ऑगस्ट 2019 चा शासन निर्णय लागू करण्याची आवश्यकता आहे. रोगराई पसरु नये याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
शेती वाहून गेल्याने त्यात मोठया प्रमाणावर रेती आली असून, ती काढण्याच्या दृष्टीने रोजगार हमी योजनेचे विशेष अभियान राबविण्याची आवश्यकता आहे. 29 ऑगस्टच्या शासन निर्णयात ज्यांची घरे पूर्णपणे पडली त्यांना घरभाडयासाठी 24 हजार रूपये दिले ते तातडीने द्यावे, सर्व सरकारी योजना एकत्रित करून पुरग्रस्तांना मदत करावी, अशी मागणीही आ. मुनगंटीवार यांनी यावेळी केली. महाराष्ट्र सरकारने या आपद परिस्थीतीत सढळ हाताने पुरग्रस्तांना मदत करावी असेही ते म्हणाले. पुरग्रस्त भागात भाजपातर्फे मदतकार्य सुरू असून, भारतीय जनता पार्टी पुरग्रस्त नागरिकांच्या पुर्णपणे पाठीशी असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

