Share

येथे कुंपनच शेत खाते! जप्तीच्या मुद्देमालात पोलिसाकडूनच अपहार

Published On: 

🕒 1 min read

बीड : येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात कुंपनानेच शेत खाल्ल्याचा प्रकार समोर आला आहे. विविध गुन्ह्यांत जप्त केलेल्या मुद्देमालात ६० हजार ११० रुपयांचा अपहार करून गुन्हे प्रलंबित ठेवल्याप्रकरणी हवालदार मनोहर काकडे याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काकडे हे शिवाजीनगर ठाण्यात कार्यरत आहेत. परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या वार्षिक तपासणीच्या पार्श्वभूमीवर प्रलंबित गुन्हे निकाली काढण्यासोबतच जप्त मुद्देमालाची निर्गती करण्याचे आदेश एसपींनी दिले होते. मात्र, शिवाजीनगर ठाण्यातील हवालदार काकडे यांनी २०१३ पासून सात गुन्हे प्रलंबित ठेऊन त्यात जप्त केलेल्या ६० हजार ११० रुपयांच्या रकमेचा अपहार केला.

शिवाय तपास प्रलंबित ठेऊन आरोपींना सहकार्य करत कर्तव्यात कुचराई केल्याचा ठपका ठेऊन पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांनी अहवाल पोलीस अधीक्षक आर. राजा यांना पाठविला होता. पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून  काकडे यांच्याविरुध्द बीड शहर ठाण्यात महाराष्ट्र पब्लिक रेकॉर्ड ॲक्ट २००५ नुसार गुन्हा नोंद झाला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!