🕒 1 min read
मुंबई : अभिनेता मनोज बाजपेयी अभिनीत ‘द फॅमिली मॅन’ या वेब सिरीजच्या पहिल्या भागाला उंदड प्रतिसाद मिळाला होता. प्रेक्षकांनी पहिल्या भागानंतर दुसऱ्या भागाची मागणी केली होती. प्रेक्षकांच्या मागणीनुसार या सीरीजच्या निर्मात्यांनी दुसरा भाग काही आठवड्यापुर्वीच प्रदर्शीत केला.
पहिल्या भागाप्रमाणे दुसऱ्या भागाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. फॅमिली मॅन सीरीजचा दुसरा भाग इतका प्रसिद्ध झाला की तो जगातील सर्वात लोकप्रिय वेब सीरीजच्या यादीत चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे. द फॅमिली मॅन ही आयएमडीबीवरील जगातील चौथी सर्वाधिक लोकप्रिय वेब सीरीज बनली आहे. या सिरीजने ‘फ्रेंड्स’ आणि ‘ग्रेज अनोटोमी’ यासारख्या सीरीजला मागे टाकत पहिल्या चार मध्ये स्थान मिळवले आहे.
#TheFamilyManSeason2 is the 4th most popular show in the world right now! ???? @BajpayeeManoj @Samanthaprabhu2 @sumank @Suparn @sharibhashmi @PrimeVideoIN @IMDb pic.twitter.com/Zq92vB3vJU
— Raj & DK (@rajndk) June 20, 2021
या यादीत पहिल्या स्थानी ‘लोकी’ दुसऱ्या स्थानी ‘स्वीट टूथ’ आणि चौथ्या स्थानी ‘मेअर ऑफ इस्टटाऊन’ या वेब सिरीज आहेत. ‘द फॅमिली मॅन २’ मध्ये मनोज बाजपेयी, शरिब हाश्मी आणि अभिनेत्री समंथा अक्किनेनी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या वेब सिरीजचे दिग्दर्शन राज डीके यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- नुसरत जहां यांच्या लग्नाचा वाद संसदेत! भाजपने केली ‘ही’ मागणी
- ‘काश्मीरवर तोडगा निघाल्यास अण्वस्त्रांची गरजच नाही’, पाक पंतप्रधानांचा भारताला इशारा
- ‘बावनकुळेंचे वक्तव्य गांभिर्याने घेण्याची गरज नाही’, विनायक राऊतांचा टोला
- ‘पवारांच्या पे रोलवर राहून बाजू घेण्यापेक्षा सर्वसामान्य शिवसैनिकांच्या व्यथा मांडा’
- पंजाबमध्ये नवज्योत सिंह सिद्धू ‘या’ पक्षाचा असू शकतात मुख्यमंत्री पदाचा चेहरा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
