Share

Uddhav Thackeray Live : “आदित्यला बडवे म्हणायचे आणि स्वतःचा पोरगा खासदार, त्यांना काय कमी केलं?”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार संकटात सापडले आहे. या सर्व घडामोडी घडत असताना आज उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांशी ऑनलाईन सवांद साधला. यापुढे माझं नाव, माझा फोटो आणि शिवसेना हे नाव न वापरत जगून दाखवा, तुमच्याकडून शिवसेना फोडण्याचं पाप झालंय, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांचा चांगलाच समाचार घेतलाय.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले कि, भाजपसोबत जायला पाहिजे म्हणून काहींचा दबाव आहे पण मी शांत आहे. संजय राठोड यांच्यावर वाईट आरोप होऊनही मी त्यांना सांभाळलं. आदित्यला बडवे म्हणायचे आणि स्व:ताचा पोरगा खासदार, त्यांना काय कमी केलं? नगरविकास खातं त्यांच्याकडं दिलं, अजून काय हवं होतं? असा संतप्त सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना केला.

तसेच पुढे माझं मुख्यमंत्रीपद मान्य नसणं ही राक्षसी महत्त्वकांक्षा आहे. एकनाथ शिंदेंसाठी काय कमी केलं? नगरविकास खातं दिलं, माझ्याकडील दोन खाती शिंदेंना दिली, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच मेलो तरी शिवसेना सोडणार नाही म्हणणारे पळून गेले. काहींनी मी बरा होऊ नये म्हणून देव पाण्यात ठेवल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.

दरम्यान, आज मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी राऊत म्हणाले कि, फक्त कायदेशीर मार्ग नाही तर सर्व प्रकारचे मार्ग अवलंबणार आहोत. यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या साक्षीनं आम्ही हार मानणार नाही असं सांगतो. आम्ही सभागृहात जिंकू, जर रस्त्यावर लढाई झाली तर तिथेही जिंकू. ज्यांना आमचा सामना करायचा आहे ते मुंबईत येऊ शकतात, असं आव्हान देखील संजय राऊत यांनी दिल आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!