Share

पाच किलो मटण फुकटात न दिल्यामुळे दारुड्याने घेतला मटण विक्रेत्याचा जीव

Published On: 

पटणा : दारूची नशा हि जगभरात विषाप्रमाणे मानली जाते व सगळ्यात जास्त घातक मानली जाते. या नशेमध्ये माणूस काही करेल याचा काही नेम नसतो. याच दारूच्या नशेतून माणसाच्या हातून अशा काही घटना होतात त्याचा पशाताप त्यांना आयुष्यभरासाठी करावा लागू शकतो. अशीच एक घटना बिहारच्या भोजपूर जिल्ह्यातील एकवारी गावात घडली आहे.

एकवारी गावात अयोध्या साह यांचं मटण आणि मासे विक्रीचं दुकान होते. नेहमीप्रमाणं मंगळवारी ते आपल्या दुकानात मासे आणि मटणाची विक्री करत होते. त्याचवेळी गावातील चौधरी नावाची व्यक्ती दारूच्या नशेत तिथे आला आणि पाच किलो मटण मागितले. त्याचे पैसे आपण देणार नसून दुकानदाराने आपल्याला फुटकात मटण द्यावे, अशी त्याची मागणी होती. त्याला नकार दिल्यानंतर चौधरीने साह यांना त्याने मारहाण करायला सुरुवात केली.

काही वेळाने त्याने काही सहकाऱ्यांना देखील बोलावून घेतले आणि सर्वांनी मिळून अगोदर प्रचंड मारहाण केली. त्यानंतर धारदार शस्त्रांनी साह यांच्या शरीरावर वार केले. गंभीर जखमी झालेल्या साह यांना नदी किनारी फेकून सर्वांनी तिथून पोबारा केला. या घटनेची कल्पना आजूबाजूच्या नागरिकांनी विक्रेत्याच्या कुटुंबीयांना दिली. त्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत साह यांना स्थानिक हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र रुग्णाची परिस्थिती गंभीर असल्यामुळे त्यांना पटनाला हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. पटनाला नेत असताना वाटेतच साह यांचा मृत्यू झाला. त्यामुळे सध्या पंचक्रोशीमध्ये अतिशय भीतीचे वातावरण पसरले असल्याचे पहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!