मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटर बॉम्ब टाकल्यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर पुन्हा एक मोठा प्रहार केला आहे. मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलीस दलातील बदल्यांमध्ये झालेल्या हेरफाराबद्दल महाविकास आघाडी सरकारवर आरोप केले आहेत.
या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच फडणवीसांनी शरद पवारांना टोला लगावला. विशेष म्हणजे आज झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेची नियमित प्रथा मोडली आहे. यावेळी त्यांनी मला पवारांसारखा इंग्रजी येत नाही, असा टोलाही लगावला आहे.
नमस्कार, मी पहिल्यांदा तुमची क्षमा मागतो की आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आपण पहिल्यांदा मराठीत प्रेस घेतो नंतर हिंदीत करतो. पण शरद पवारांनी हा विषय राष्ट्रीय केला असल्याने आज आपला प्रकार बदलून तमाम मराठी पत्रकारांची आणि माय मराठीची क्षमा मागून मी आजची पत्रकार परिषद हिंदीत सुरु करणार आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- यू ट्यूब घेत आहे नवीन फिचरची चाचणी; कॉपी कंटेंटला बसणार चाप
- “लोगों का काम है कहेना, बेकार की बातों में कहीं बीत ना जाये रैना…”, कोहलीची के.एल. राहुलसाठी बॅटिंग
- परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेली याचिका खोटी आहे का ?
- भाजपा महाराष्ट्रासाठी एक न्याय आणि गुजरातसाठी दुसरा न्याय का लावत आहे ?
- ‘भारतमातेच्या सुपुत्रांच हे बलिदान देशाच्या प्रत्येक पिढीसाठी प्रेरणास्रोत बनून राहील’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

